राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय! खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव – २०२६’ चे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्लीत 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' चे दिमाखात उद्घाटन. 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'चीही सुरुवात.

नवी दिल्ली: मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय स्तरावर हक्काचे आणि मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव – २०२६’ चा शानदार शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. राजधानी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ नेते तथा खासदार विनोद तावडे यांच्या प्रमुख हस्ते महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. याच कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे’ देखील अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

    या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यास खासदार विनोद तावडे यांच्यासह निवासी आयुक्त श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि महामंडळाच्या वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू यांच्यासह अनेक मान्यवर व दिल्लीतील मराठी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. विनोद तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला सखोल प्रभाव अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केला. दिल्लीसह संपूर्ण देशभरात मराठी कला, संस्कृती आणि साहित्याबद्दल नितांत आदर असल्याचे सांगत त्यांनी, मराठी चित्रपट व नाट्यकृतींनी अनेक हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांना कशी प्रेरणा दिली, याचा इतिहास उजळवला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘पाठलाग’, ‘कुंकू’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘नटसम्राट’, ‘अशी ही बनवाबनवी’ आणि ‘फेकाफेकी’ यांसारख्या अजरामर मराठी कलाकृतींनी भारतीय चित्रपट सृष्टीला नेहमीच समृद्ध केले आहे, असे नमूद करत त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर, विजयाबाई मेहता आणि शांता शेळके यांच्या गौरवशाली स्मृतींना उजाळा दिला. उत्कृष्ट कलाकृती निर्मिती मागील समर्पण, शिस्त आणि सूक्ष्म निरीक्षण यामुळेच मराठी कलाकृती काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने टिकल्या आहेत, असे सांगत भविष्यात दिल्लीत केवळ चित्रपटच नव्हे तर भव्य ‘मराठी नाट्य महोत्सवाचा’ देखील विस्तार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    याप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ स्थापन करण्यामागची मुख्य भूमिका स्पष्ट केली. मराठी चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते प्रेक्षकांना सखोल विचार करायला प्रवृत्त करतात, असे सांगून त्यांनी महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा राजधानीतील मराठी व इतर भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. यापुढे महाराष्ट्र सदनामध्ये नियमितपणे उत्कृष्ट मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, कार्यालयीन वेळेनंतरही नागरिकांना दर्जेदार मराठी चित्रपटांचा आनंद घेता येईल, असे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील सांस्कृतिक सेतू अधिक मजबूत करणारी ही एक महत्त्वाची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी चित्रनगरीचा गौरवशाली इतिहास व मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला.

   दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे यांनी प्रास्ताविकात, राजधानीत पहिल्यांदाच आयोजित झालेला हा महोत्सव मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक ऐतिहासिक मैलाचा पत्थर ठरेल, असे मत व्यक्त केले. दिल्लीतील मराठी बांधवांना एकत्र आणत मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचे कार्य प्रतिष्ठान करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गार्गे यांनी केले. दरम्यान, यापुढे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव’ नियमितपणे आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सदनामध्ये वर्षभर दर महिन्याला एका शनिवारी मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन आणि चित्रपट रसास्वाद उपक्रम राबविला जाणार असून, यामुळे राजधानीत मराठी संस्कृतीचा वारसा अधिक जोपासण्यास मदत होणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या

Latest News

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतींमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव...
अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी
परदेशी निधीवर सरकारचा कडक अंकुश; ‘एफसीआरए सुधारणा विधेयक २०२६’ संसदेत मांडणार
भारताचा चीनला सणसणीत दणका! अरुणाचल सीमेजवळील २७ महत्त्वाची ठिकाणे अधिकृत भारतीय नकाशात समाविष्ट
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software