पक्षफुटीपेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

पक्षफुटीचे राजकारण सोडून जनतेचे प्रश्न सोडवा; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. सर्वोच्च न्यायालयातील विलंब आणि मुंबई सुरक्षेवरूनही उठवले प्रश्न.

मुंबई: राजकीय पक्षांमध्ये आणि आमदारां मध्ये सतत फूट पाडण्याचे राजकारण करण्यापेक्षा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देण्याची खरी गरज असल्याचे स्पष्ट करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक ज्वलंत राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढची तारीख पडत असल्याबद्दल त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या वादावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी भूमिका मांडली.

        मुंबईतील अलीकडील काही सुरक्षा विषयक घटनांचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईत घडलेल्या काही संशयास्पद घटना नेमक्या कोणी आणि कशा घडवल्या, तसेच या प्रकरणांत खरोखर कोणाला अटक झाली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही, असे सांगत त्यांनी यामागील खरे सूत्रधार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जनतेसमोर उघडे पाडण्याची मागणी केली. "हे पहलगाम नाही, हे मुंबई आहे; बाहेरून कोणीतरी येते आणि स्थानिक यंत्रणेला काहीच थांगपत्ता लागत नाही, असे कसे होऊ शकते?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर प्रशासनाने अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सूचित केले.

        सणासुदीच्या आणि आगामी काळातील वातावरणा बाबत बोलताना त्यांनी, सणांच्या काळात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करत आहे का, यावरही भाष्य केले. संबंधित सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील व्यक्ती आणि संघटनांचा पर्दाफाश केला पाहिजे. दोषांना केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी घेतली. फोडाफोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढताना त्यांनी, सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण लक्ष केवळ इतर पक्षांमधील आमदार आणि खासदार फोडण्यावरच केंद्रित असल्याचा आरोप करत यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले. पक्षाच्या चिन्हावरील कायदेशीर लढा सुरू असतानाच त्यांनी कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरल्यामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले

Latest News

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांच्या विमानाचे झ्युरीकला इमर्जन्सी लँडिंग. शिंदे वेळेत लंडनमध्ये दाखल.
गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेवर संजय राऊतांचे मोठे विधान
विनापरवाना गाळे उभारून भाड्याने दिले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई
काँग्रेसच्या काळातील विकासावर मोदींचा निशाणा; वडोदऱ्यात ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मुंढव्यातून १४ चोरीचे मोबाईल जप्त; दोन सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software