समर्थ पोलिसांची धडक कारवाई, वृद्ध महिलांना लक्ष्य करणारी टोळी जेरबंद

पुण्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांना लुटणाऱ्या सराईत टोळीचा समर्थ पोलिसांकडून पर्दाफाश. ३ आरोपींना अटक करून १५ लाखांचे सोने जप्त.

पुणे: शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या वृद्ध आणि ज्येष्ठ महिलांना लिलया लक्ष करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा समर्थ पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील सुमारे १५ लाख रुपये बाजारमूल्याचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून, या टोळीच्या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्हे उघडकीस आले आहेत.

        समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहिती नुसार, गत १४ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक ज्येष्ठ महिला पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ या दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली होती. प्रवासादरम्यान रिक्षात बसलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी संगनमत करून प्रवाशाच्या गर्दीचा व नजरचुकीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लपवून चोरली होती. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून समर्थ पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर व तांत्रिक तपास करत असताना पोलिसांना आरोपी हे मूळचे जळगाव परिसरातील असून, ते वृद्ध व अल्पसंख्याक प्रवाशांना टार्गेट करून हातचलाखीने मौल्यवान वस्तू चोरण्याच्या गुन्ह्यात मास्टर असल्यागोष्टीची गोपनीय माहिती मिळाली.

      तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) या मुख्य संशयिताचा शोध घेऊन १ जुलै २०२६ रोजी त्याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचे अन्य साथीदार मोसीन खान नूर खान (वय ३१) आणि इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, दोघेही रा. जळगाव) यांचा शोध सुरू केला. हे दोघे जण पुन्हा अशाच प्रकारचा एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची भनक लागताच पुणे पोलिसांच्या पथकाने मालधक्का चौक परिसरात सापळा रचून त्यांना २ सप्टेंबर २०२६ रोजी शिताफीने ताब्यात घेतले आणि संबंधित गुन्ह्यात अटक केली.

      पोलिस चौकशी दरम्यान आरोपींनी पुणे शहरातील सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरासह विविध भागांत अशाच प्रकारे हातचलाखी करून अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरलेला माल जप्त करताना पोलिसांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे हस्तगत केले असून, त्यांची एकूण किंमत १५ लाख रुपयांच्या घरात आहे. ही यशस्वी व कौतुकास्पद कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व तपास पथकातील अंमलदारांनी अत्यंत वेगाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडली.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले

Latest News

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांच्या विमानाचे झ्युरीकला इमर्जन्सी लँडिंग. शिंदे वेळेत लंडनमध्ये दाखल.
गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेवर संजय राऊतांचे मोठे विधान
विनापरवाना गाळे उभारून भाड्याने दिले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई
काँग्रेसच्या काळातील विकासावर मोदींचा निशाणा; वडोदऱ्यात ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मुंढव्यातून १४ चोरीचे मोबाईल जप्त; दोन सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software