विनापरवाना गाळे उभारून भाड्याने दिले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई

पिंपरीतील महिंद्रा अँथिया सोसायटीत मोकळ्या जागेत अनधिकृत गाळे उभारल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पालिकेची नोटीस. उपनिबंधकांकडे पत्रव्यवहार.

पिंपरी: पिंपरीतील नेहरूनगर परिसरातील नामांकित ‘महिंद्रा अँथिया’ सहकारी गृहरचना सोसायटीच्या आवारात मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करत अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे उभारून ते इतर व्यावसायिकांना भाड्याने दिल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सामायिक वापरासाठी व मोकळ्या जागेसाठी (ओपन स्पेस) आरक्षित असलेल्या भागात परस्पर फेरफार करून ही दुकाने थाटण्यात आली असून, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी केलेल्या पुराव्यानिशी तक्रारीची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या धडक कारवाईमुळे सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, दोषी पदाधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाईची जोरदार टांगती तलवार कायम झाली आहे.

       प्राप्त माहितीनुसार, महिंद्रा अँथिया या गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील इमारतीच्या सामायिक जागेत आणि मंजूर नकाशात कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना अंतर्गत फेरफार करून व्यावसायिक गाळे तयार करण्यात आले. हे अनधिकृत गाळे बाहेरील व्यावसायिकांना भाड्याने देऊन त्यातून नियमित आर्थिक उत्पन्न लाटण्यात येत असल्याचा ठपका ठेवत तक्रार दाखल करण्यात आली होती. सामायिक मोकळ्या जागेचा अशा प्रकारे नियमबाह्य व्यावसायिक वापर होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी मंजूर बांधकाम नकाशाच्या अधिकृत प्रती आणि छायाचित्रांसह महापालिकेकडे सविस्तर तक्रार नोंदवली. याप्रकरणी विनापरवाना व नियमबाह्य व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती.

        महापालिकेने बजावलेल्या या कठोर नोटीसमुळे सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे धाबे दणाणले आहेत. मंजूर नकाशा व्यतिरिक्त करण्यात आलेले हे बेकायदेशीर बदल आणि व्यावसायिक वापरा बाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आता प्रशासना समोर उत्तरे द्यावी लागणार आहेत. अनधिकृत बांधकाम किंवा वापराचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नियमां नुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाया होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ महापालिका स्तरावरच नव्हे, तर या प्रकरणाची व्याप्ती वाढवत महापालिकेने जिल्हा उपनिबंधकांकडेही अधिकृत पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेची नोटीस बजावूनही अनधिकृत गाळे स्वेच्छेने न हटविल्या प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि संबंधित नियमांचा भंग झाला आहे का, याची सखोल तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

     या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आणि मंजूर नकाशाशी प्रत्यक्ष बांधकामाची पडताळणी करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी स्पष्ट केले की, महिंद्रा अँथिया सोसायटीत मंजूर नकाशात बदल करून विनापरवाना दुकाने व गाळे काढल्या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करून कागदपत्रांची कसून पडताळणी केली जात असून, याप्रकरणी लवकरच वस्तुनिष्ठ अहवाल मागवून नियमा नुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले

Latest News

शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांच्या विमानाचे झ्युरीकला इमर्जन्सी लँडिंग. शिंदे वेळेत लंडनमध्ये दाखल.
गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेवर संजय राऊतांचे मोठे विधान
विनापरवाना गाळे उभारून भाड्याने दिले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई
काँग्रेसच्या काळातील विकासावर मोदींचा निशाणा; वडोदऱ्यात ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मुंढव्यातून १४ चोरीचे मोबाईल जप्त; दोन सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software