विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६ पुण्यात तरुणाईला एकत्र आणण्याची तयारी

पुण्यातील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 'विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६'चे भव्य आयोजन. देशभरातून १ हजार प्रतिनिधी अन् १ लाख तरुणांचा सहभाग.

मुंबई: देशातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्रात एका भव्य राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात रंगणाऱ्या याविकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ (Viksit Bharat Youth Conclave-2026) या तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनामुळे संपूर्ण देशातील तरुणाईला एक मजबूत व्यासपीठ मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

            या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

      पुण्यातील जागतिक दर्जाच्या श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हे राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलन पार पडणार आहे. या महोत्सवात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रतिभावान युवकांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे ३० ते ३५ प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी होतील, ज्यामध्ये देशभरातून एकूण एक हजार प्रतिनिधी एकत्र येतील. विशेष म्हणजे, यात महाराष्ट्राचे ३०० प्रतिनिधी तर इतर राज्यांमधून ७०० प्रतिनिधी सामील होणार आहेत. या तीन दिवसांच्या भव्य महोत्सवात राज्यभरातून तब्बल एक लाखांहून अधिक युवकांचा सहभाग (फूटफॉल) राहावा, यासाठी प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.

या युवा संमेलनाची रचना अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली असून, महोत्सवाची संकल्पनावॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल’ या तीन प्रमुख अनुभव क्षेत्रांवर (Zones) आधारित असेल. याद्वारे युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता, संस्कृती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रत्ययकारी अनुभव मिळणार आहे:

  • वॉरिअर झोन: यामध्ये युवकांमध्ये सामर्थ्य, शिस्त आणि धैर्य विकसित करण्यावर भर दिला जाईल. स्वसंरक्षण कार्यशाळा, क्रीडा विज्ञान, पोषण आहार, क्रीडा मानसशास्त्र, आर्मी ऑब्स्टॅकल कोर्स, वॉल क्लायम्बिंग, रिअॅक्शन टाइम अरेना यांसारखे फिटनेस व साहसी उपक्रम यात समाविष्ट असतील.
  • फ्युचर झोन: पुणे हे देशातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र असल्याने, या झोनमध्ये युवकांच्या डिजिटल व तंत्रज्ञान विषयक क्षमतांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल.
  • कल्चरल झोन: याद्वारे सर्जनशीलता, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम घडवून आणला जाईल. महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, चित्रकला, छायाचित्रण यांसारख्या कलाप्रकारांच्या स्पर्धा भरवल्या जातील. तसेच योग, ध्यान, मानसिक आरोग्य, श्वसनाचे व्यायाम, पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि शाश्वत जीवनशैलीची ओळख करून दिली जाईल.

महोत्सवाचे संपूर्ण व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल प्रणाली विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ऑनलाइन नोंदणी, राज्यनिहाय नामनिर्देशन, कागदपत्र पडताळणी, क्युआर कोड आधारित डिजिटल ओळखपत्र (QR Code ID), मोबाईल मार्गदर्शक ॲप आणि थेट सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

   केंद्राच्या ‘खेलो इंडिया’ अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून, महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग नोंदवावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) वाढवण्यावर भर दिला जावा. यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाऊंडेशन्स सोबत समन्वय साधून आगामी दशकात महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात देशात अग्रगण्य बनविण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग

Latest News

लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग
लोणावळ्यातील टायगर पॉईंट रस्त्याचे ७ मीटर रुंदीकरण वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश. आमदार सुनील शेळके व PMRDA आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याकडून...
राज्यातील १,२३१ महाविद्यालये होणार डिजिटल; ‘ई-ऑफिस’ प्रणालीचे लोकार्पण
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसना साठी फिरते पथक योजना तातडीने कार्यान्वित करा; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
झारखंड छात्र आंदोलनावरून राजकीय वाद; निशिकांत दुबेंची राहुल गांधींवर जहरी टीका
मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software