झारखंड छात्र आंदोलनावरून राजकीय वाद; निशिकांत दुबेंची राहुल गांधींवर जहरी टीका

झारखंडमधील भरती परीक्षा गैरव्यवहारावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने. निशिकांत दुबेंची राहुल गांधींवर कडक टीका; पाहा सविस्तर अपडेट.

रांची: झारखंडमध्ये नोकरीच्या विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमितता आणि गैरव्यवहारा विरोधात गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता अत्यंत टोकाचे राजकीय रूप धारण केले आहे. याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त शब्दांत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्यापेक्षाही वाईट नेते असून, जिन्नांचा दुसरा जन्म हा राहुल गांधी यांच्या रूपाने झाला आहे, असे खळबळ जनक विधान निशिकांत दुबे यांनी केले आहे.

      झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या विरोध-प्रदर्शनावर बोलताना खासदार निशिकांत दुबे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “हेमंत सोरेन सरकार या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्यास का घाबरत आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी धर्मेंद्र याला झारखंड सरकारच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या सरकारी घरातून अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जर या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी झाली, तर यात थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नावही समोर येईल, म्हणूनच हा सर्व प्रकार लपवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने झारखंड सरकारकडून आपले समर्थन तात्काळ मागे घ्यावे आणि आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात कुठेही निदर्शने झाली की तिथे राहुल गांधी आवर्जून उपस्थित असतात, असा टोमणा मारत दुबे यांनी त्यांना ‘जिन्ना पेक्षाही वाईट’ म्हटले. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर करत “जिन्नाचा जन्म राहुल गांधीजींच्या रूपामध्ये झाल आहे,” अशी घणाघाती टीका केली.

       दुसरीकडे, झारखंडमध्ये नोकरीच्या उमेदवारांचे हे आंदोलन बुधवारी सलग १९ व्या दिवशीही सुरूच आहे. परीक्षांमधील पारदर्शकता, वादग्रस्त परीक्षा रद्द करणे आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. झारखंड लोक सेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी चयन आयोग (JSSC) च्या परीक्षांमधील गैरव्यवहारा विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी किंवा राज्याबाहेरील निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे.

       या आंदोलना दरम्यान सोमवारी विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याचा तीव्र प्रयत्न केला. या मोर्चा दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि वॉटर कॅननचा वापर केला. या झटापटीत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे रांची पोलिसांनुसार या संघर्षात त्यांचे १४ जवानही जखमी झाले आहेत. या पोलीस दडपशाही आणि कारवाईच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी राज्यव्यापी ‘झारखंड बंद’ची हाक दिली होती, ज्याचा मोठा प्रभाव राज्यातील विविध जिल्ह्यांत पाहायला मिळाला. बंद दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते जाम करण्यात आले, बाजारपेठा बंद राहिल्या आणि शैक्षणिक संस्थांवरही याचा परिणाम झाला.

        या सर्व गदारोळावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपली सरकार भरती परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यात व्यापक सुधारणा करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढताना त्यांनी १४ वी JPSC परीक्षा रद्द करण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, दुसरीकडे सोरेन यांनी विरोधकांवर निशाणा साधत, भाजप या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर केवळ स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि राजकीय मंच म्हणून करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिणामी, झारखंडमधील हा छात्र आंदोलनाचा मुद्दा आता केवळ परीक्षा सुधारणा पुरता मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील अत्यंत तीव्र राजकीय संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग

Latest News

लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग लोणावळ्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा; रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग
लोणावळ्यातील टायगर पॉईंट रस्त्याचे ७ मीटर रुंदीकरण वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश. आमदार सुनील शेळके व PMRDA आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याकडून...
राज्यातील १,२३१ महाविद्यालये होणार डिजिटल; ‘ई-ऑफिस’ प्रणालीचे लोकार्पण
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसना साठी फिरते पथक योजना तातडीने कार्यान्वित करा; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
झारखंड छात्र आंदोलनावरून राजकीय वाद; निशिकांत दुबेंची राहुल गांधींवर जहरी टीका
मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software