सर्वोच्च न्यायालया बाहेर ठाकरे-शिंदे गट आमने सामने; अनिल देसाई आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान बाहेर ठाकरे व शिंदे गटाचे नेते आमनेसामने. अनिल देसाई, संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक चकमक.

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच न्यायालया बाहेर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुनावणीनंतर दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात वाद झाल्याचे समोर आले.

          सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी शिवसेनेच्या सत्तासंघर्षाशी संबंधित प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर न्यायालयाच्या परिसरातून बाहेर येताना दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते समोरासमोर आले.

    यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने गेल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या नेत्यांना दूर केले. त्यानंतर नरेश म्हस्के तेथून निघून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत असून, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Latest News

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
कोलकाता-चेन्नई इंडिगो विमानाच्या (6E-723) इंजिनमध्ये बिघाड. पायलटने दाखवले प्रसंगावधान; २२४ प्रवाशांसह चेन्नई विमानतळावर सुरक्षित लँडिंग.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख केंद्र बनवणार; फडणवीसांची घोषणा
सर्वोच्च न्यायालया बाहेर ठाकरे-शिंदे गट आमने सामने; अनिल देसाई आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
सुपने मंडळाच्या विकासकामांना वेग; कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software