रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांवर खोचक वार; 'एक दिवसाचा मुख्यमंत्री'चा उल्लेख

संजय राऊतांच्या 'लापता गृहमंत्री' टीकेवर रावसाहेब दानवे यांचा जोरदार पलटवार. 'एक दिवसाचा मुख्यमंत्री' चित्रपट काढण्याचा उपरोधिक सल्ला.

जालना: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच ‘लापता गृहमंत्री’ या शीर्षकाचा चित्रपट काढण्याची खोचक टीका केली होती. या टीकेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी अत्यंत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये सतत झळकायची सवय असल्यामुळेच ते अशा प्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठी विधाने करत असतात, असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच, संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर चित्रपट काढण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळावरएक दिवसाचा मुख्यमंत्री’ या नावाचा चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

     जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, लोकांमध्ये यांच्यासोबत फिरणे किंवा राहणे म्हणजे स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही अफाट असून, ती कमी किंवा जास्त करणे हे संजय राऊत यांच्या हातात नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

लोकसभेच्या अधिवेशनाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन हे जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी असते. मात्र, विरोधकांनी या अधिवेशनात सात दिवसांत एकदाही चर्चेत सहभाग घेतला नाही, तर केवळ गोंधळ घालण्याचे काम केले. विरोधकांना पेपरफुटीसारख्या गंभीर विषयाशी काहीही देणेघेणे नसून, केवळ चॅनेलवर आपले तोंड दिसावे आणि प्रसिद्धी मिळावी, यासाठीच हा सर्व आटापिटा सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. तसेच, देशात घडलेले पेपरफुटीचे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत, हे मान्य केले तरी यापूर्वीच्या काळातही असे प्रकार घडले आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान सभागृहात येत असतात, मात्र कोणताही पंतप्रधान संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत पूर्णवेळ सभागृहात बसून राहत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची टोळी तयार केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, खरे गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक नेमके कुणासोबत आहेत, हे महाराष्ट्राची जनताळ चांगल्या प्रकारे जाणते. वास्तविक पाहता, यांच्याच पक्षात आणि यांच्याच मंत्रिमंडळात असलेलले लोक कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत, हे तपासावे. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने नेहमीच मातीचे राजकारण ओळखले असून, नको असलेल्या लोकांना निवडणुकीत साफ मातीत मिळवले आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेचा रावसाहेब दानवे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा विशेषतः महिला नेत्यावर अशा प्रकारची वैयक्तिक टीका करणे अतिशय चुकीचे आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवीन आहेत. अजित दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे, त्यामुळे त्यांच्या सध्याच्या कामाचे अशा प्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. विरोधकांचे असे वर्णन करणे ही काँग्रेस पक्षाची सुरुवाती पासूनची जुनी संस्कृती राहिली आहे, कारण ते कधीही कोणाचे चांगले बोलू शकत नाहीत, अशा शब्दांत दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल

Latest News

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे: इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या...
११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याचे बलुच संघटनांचे आवाहन; पाकिस्तानची चिंता वाढली
राज्याच्या अन्नधान्य कोट्यात कपात होणार नाही; प्रल्हाद जोशींचे मोठे आश्वासन
कर प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार; परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा
अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र-गोवा समन्वय; नितेश राणेंचा पुढाकार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software