पुणेकरांना म्हाडाच्या घरांसाठी आणखी एक संधी; ४,४६२ सदनिकांसाठी अर्जाची मुदतवाढ, २६ नोव्हेंबरला सोडत

म्हडाच्या पुणे मंडळाकडून ४,४६२ घरांसाठी अर्जाची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निघणार बहुप्रतिक्षित सोडत.

पुणे: पुण्यामध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाकडून अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या तब्बल ४ हजार ४६२ सदनिकांच्या भव्य सोडतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि कागदपत्र तयारी करणाऱ्या नागरिकांना आणखी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी प्रक्रिये दरम्यान अर्जदारांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि विविध पूरक समस्यांचा सखोल विचार करून म्हाडा प्रशासनाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत थेट १५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे यापूर्वी घोषित करण्यात आलेली सोडतीची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली असून, आता आगामी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ही बहुप्रतिक्षित सोडत जाहीर केली जाणार आहे.

        पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विविध संवर्गातील सदनिकांच्या वितरणासाठी यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली होती. मूळ वेळापत्रका नुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, कागदपत्र पडताळणीत अर्जदारांची होणारी ससेोलपट आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता पावले उचलत मुदतीत तब्बल एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. या सोडतीमध्ये एकूण ४ हजार ४६२ आकर्षक सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ९७१, तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४९१ सदनिकांचा समावेश आहे. भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १ हजार ४०६, तर पीएमआरडीए (PMRDA) क्षेत्रात १ हजार ५८८ सदनिका उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या सर्व नवीन घरांसोबतच मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ सदनिकांचा देखील यंदाच्या सोडतीत समावेश करण्यात आल्यामुळे घर खरेदीसाठी उत्सुक असलेल्या नागरिकांचा उत्साह वाढला आहे.

       या सुधारित मुदती नुसार आता इच्छुक नागरिकांना १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे सादर करता येणार आहेत. ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी त्याच दिवशी रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत असेल, तर आरटीजीएस (RTGS) किंवा एनईएफटी (NEFT) द्वारे रक्कम भरू इच्छिणाऱ्यांना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची सवलत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी आगामी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप यादीवर नागरिकांना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले वैध दावे आणि हरकती नोंदविता येतील. त्यानंतर सर्व हरकतींची छाननी करून अंतिम यादी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर केली जाईल.

      तसेच, अर्जदारांच्या सोयीसाठी उत्पन्न दाखल्या बाबत मोठा दिलासा देताना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा वैध उत्पन्न दाखला अथवा प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय प्रणालीद्वारे सोडत काढली जाईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता यशस्वी ठरलेल्या भाग्यवान अर्जदारांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार असून, यामुळे हजारो पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी

Latest News

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी
पुण्यातील लोहेगाव विमानतळाच्या १५ किमी परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईट वापरावर २२ सप्टेंबर पासून ६० दिवसांची बंदी घालण्यात आली...
पुण्यात ४,४२७ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास
पुण्यात १९ पदांसाठी भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा रूट मार्च; परिमंडळ-३ मध्ये १२० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software