गरब्यात मुलींची बोली लावल्याचा आरोप; संभाजी ब्रिगेड आक्रमक, आयोजकांना इशारा

पुण्यात गरब्यासाठी मुलींची १ ते ५ हजार रुपयांची बोली लावून भाडेतत्त्वावर बोलावण्याचा आरोप. संभाजी ब्रिगेड आक्रमक, कार्यक्रम उधळण्याचा इशारा.

पुणे: भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र-गुजरात मध्ये अत्यंत उत्साहात, आदराने व सांस्कृतिक समृद्धीने साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव हा भक्ती, आनंद आणि सामूहिक एकतेचे प्रतीक मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या पवित्र उत्सवात देवी दुर्गेची आराधना करत पारंपरिक गरबा आणि डांडिया खेळण्याची परंपरा सदोदित राहिली आहे. रंगीबेरंगी वेषभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि तरुणाईचा उत्साह हे या सणाचे मुख्य आकर्षण असते. मात्र, याच पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवाला आता व्यावसायिक स्वार्थाची आणि विकृतीची किनार लागल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी गरबा डान्स करण्यासाठी मुलींना भाडेतत्त्वावर घेण्याचा आणि चक्क १ हजार ते ५ हजार रुपयां पर्यंत बोली लावून त्यांना गरब्यात नाचण्यासाठी बोलावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.

        या विकृत आणि संतापजनक प्रकारावर तीव्र आक्षेप घेत ‘संभाजी ब्रिगेड’ने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली उपलब्ध करून देण्याचा हा गोरखधंदा संभाजी ब्रिगेड कधीही सहन करणार नाही. जर गरबा खेळण्यासाठी मुला-मुलींची पैशांच्या बदल्यात हजारो रुपयांची बोली लावली जात असेल, तर पुरोगामी महाराष्ट्रात असे लाजीरवाणे कार्यक्रम सुरू ठेवू दिले जाणार नाहीत आणि जिथे असे प्रकार घडतील, तेथील कार्यक्रम थेट उधळून लावले जातील.”सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांचे बाजारीकरण करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

         एका बाजूला राज्यातील काही भागांत दुष्काळसदृश आणि गंभीर परिस्थिती असताना, दुसरीकडे अशा प्रकारचे अयोग्य व अनैतिक प्रकार उजेडात येणे ही चिंताजनक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पारंपरिक धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांचा वापर करून आर्थिक नफा कमावण्याच्या आणि संस्कृतीला कलंक लावण्याच्या या प्रयत्नांना वेळीच पायबंद घातला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात अशा व्यावसायिक आणि वादग्रस्त गरबा आयोजनांवर प्रशासनासह विविध सामाजिक संघटनांचे विशेष लक्ष असणार आहे. गरब्याची मूळ शुद्धता, पावित्र्य आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी समाजमनानेही आता जागरूक होऊन अशा विकृती विरोधात एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे नागरिकां मधून बोलले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी

Latest News

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी
पुण्यातील लोहेगाव विमानतळाच्या १५ किमी परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईट वापरावर २२ सप्टेंबर पासून ६० दिवसांची बंदी घालण्यात आली...
पुण्यात ४,४२७ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास
पुण्यात १९ पदांसाठी भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा रूट मार्च; परिमंडळ-३ मध्ये १२० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software