सातारा पोलिसांचा सराईत चोरट्यांना दणका; कराडमधील मोटारसायकल चोरांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार

कराडमधील ३ सराईत मोटारसायकल चोरांना सातारा व सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे कडक आदेश.

सातारा : सातारा जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिसांनी एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाची कारवाई केली आहे. कराड तालुका परिसरात सातत्याने मोटारसायकल चोरीचे गंभीर गुन्हे करून सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सातारा पोलिसांनी दणका देत संपूर्ण सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून तब्बल एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाने घेतलेल्या या धडक निर्णयामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य जनतेमधून या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.

        जय संजय जाधव (वय १९), प्रथमेश दत्तात्रय गवते (वय २९) आणि ओम दत्तात्रय गवते (वय १९, सर्व रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड) अशी हद्दपार करण्यात आलेल्या टोळीप्रमुख व सदस्यांची नावे आहेत. या तिघांच्या संशयित आणि गुन्हेगारी कृत्यांची व्याप्ती सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये पसरलेली असून त्यांच्यावर मोटारसायकल चोरीसारखे अनेक गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी या टोळीवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाया करूनही त्यांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया जराही थांबवल्या नव्हत्या. कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसल्यामुळे या टोळीचा वाढता उपद्रव परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत होता. त्यामुळे अशा कुख्यात गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

        जनतेच्या या मागची दखल घेत कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या कुख्यात टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा सविस्तर प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. या हद्दपार प्रस्तावाची सखोल चौकशी कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केली होती. त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या समोर या टोळीची सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या तिन्ही आरोपींना सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे सक्त आदेश पारित केले.

        आगामी गणेशोत्सव व विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित व शांततापूर्ण राहावी यासाठी पोलीस प्रशासन आता अत्यंत आक्रमक भूमिकेत आले आहे. यापुढेही जिल्ह्यातील अशा सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीसह मोक्का आणि एमपीडीए सारख्या अत्यंत कडक कायदेशीर कारवायांचा बडगा उगारला जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सदर यशस्वी कारवाई पार पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. निखील मगदुम, पो.कॉ. आनंदा जाधव आणि म.पो.कॉ. सोनाली पिसाळ यांनी हसऱ्या व सखोल पुराव्यांसह महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी

Latest News

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी
पुण्यातील लोहेगाव विमानतळाच्या १५ किमी परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईट वापरावर २२ सप्टेंबर पासून ६० दिवसांची बंदी घालण्यात आली...
पुण्यात ४,४२७ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास
पुण्यात १९ पदांसाठी भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा रूट मार्च; परिमंडळ-३ मध्ये १२० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software