- Hindi News
- सातारा
- अत्त दीप भव ! स्वयंप्रकाशित व्हा !
अत्त दीप भव ! स्वयंप्रकाशित व्हा !

शिकायचे म्हणून शिकायचे एवढेच धोरण माणसाने ठेवू नये,ज्ञान मिळवावे,कौशल्य मिळवावे,आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करावा ,त्याने व्यक्तिगत आणि समाजात चांगले योगदान द्यावे ही भावना शिक्षणात असणे अपेक्षित आहे.आपल्याकडे कसेबसे पदवी घेण्यासाठी शिक्षण घेतले जाते ,पण कौशल्य घेऊन त्याचा उपयोग सतत करून प्रभावी व्यक्तिमत्व उभे केले जात नाही.त्यामुळे परीक्षेपुरते अभ्यास करणे,तास न करणे,शिक्षकांशी अभ्यास विषयक मानसिक संवाद न करणे, स्वतः संदर्भ ग्रंथ न वाचता केवळ गाईड घेणे,अगर शिक्षकांनी काही बाही नोट्स द्याव्यात ही अपेक्षा करणे, संकल्पना समजून न घेणे ,तास सुरू असतो त्या वेळी अन्य ठिकाणी भटकणे, आपल्या आयुष्याचा प्रवास कसा नेटका करावा याचे नियोजन न करणे,ध्येयवादी नसणे,गप्पा मारण्यात वेळ घालवणे,किंवा शॉर्ट कट पद्धतीने केवळ पास होणे,कोणतीच गोष्ट वेळचे वेळी पूर्ण न करणे या गोष्टी केल्या जातात ही बेसावधपणाची लक्षणे आहेत. ज्याला आपले अस्तित्व घडवायचे आहे त्यांनी स्वतः परिपूर्ण होण्याचा ध्यास आणि प्रयत्न केले पाहिजेत l,अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रयत्नाने साध्य करायला पाहिजेत,चिकित्सक राहिले पाहिजे,अभ्यास केला पाहिजे,आपला फायदा कोणत्या गोष्टीने होईल यासाठी भोवतालचाअभ्यास केला पाहिजे,वेळ आयुष्यात कमी आहे,त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेची नासाडी करू नये ,व्यसनात पडू नये,आरोग्य चांगले ठेवले पाहिजे,प्रश्न सोडवण्यासाठी विचार करून हितकारक निर्णय घेता आले पाहिजेत,अपयश आले तरी निराश न होता नवे मार्ग ,नवे प्रयत्न केले पाहिजेत. निराश होता कामा नये ..आपण हे करू शकतो म्हणून अखंड परिश्रम करून यश जवळ आणले पाहिजे....पण आपण हे सर्व मनापासून करतो का ? आपण वेळेचा फायदा घेतो का ? आपण कौशल्य वाढवत आहोत का ? आपण माणसे जोडत आहोत का,आपणास जे लक्ष्य पूर्ण करायचे आहे त्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे का ? या गोष्टी आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. अडचणी या आव्हान आहेत समजून जिद्दीने यश मिळवण्याचा प्रयत्न करत अविरत संघर्ष करणारी माणसे जगात यश मिळवत असतात..हे समजून घ्यायला हवे.. एखादे सुंदर गाणे आपण एखाद्या गायकाचे ऐकतो ते सहजा सहजी गायलेले नसते,त्यासाठी रियाज केलेला असतो.कोणतीही मोठी व्यक्ती अपघाताने मोठी होत नाही त्यासाठी त्याचा झगडा आपण जाणून घेतला पाहिजे ...प्रतिकूल परिस्थितीत झुंज देत जिद्दीने ,कष्टाने यश मिळवणारी माणसे जगात किंमत वान होतात. सगळे आयते खाणारी माणसे दुबळी होतात ..परावलंबी होतात ..म्हणून स्वावलंबनाची शाळा रात्रंदिवस मनात चालू पाहिजे,कृतीत दिसली पाहिजे तरच वर्तमान यशाच्या निकट जाते...म्हणूनच लक्ष द्या..जाणीव ठेवा..सखोल अभ्यास करणे आणि वरवर अभ्यास करणे यात फरक आहे.. म्हणून वर वर पास होण्या पुरता अभ्यास न करता गुणवत्ता,कौशल्य ,परिपूर्णता,क्षमता या साध्य करण्यासाठी शिक्षण आहे हे लक्षात ठेवले पाहिजे...शिलाई मशीन चालवायची असेल तरीही सराव हवा आहे..वेगवेगळ्या डिझाईन, साईज प्रमाणे ड्रेस शिवाय चे म्हटले तरी ते आव्हान आहे..हे आव्हान जो काळजीने घेतो तो आणि प्रयत्नपूर्वक योग्य काम करतो त्याचे नाव मोठे होते..त्याच्याकडे माणसे विश्वासाने येत राहतात...आपण असे विश्वासू व्यक्ती झाले पाहिजे,आपली प्रतिमा काम करून मोठी झाली पाहिजे,आपली स्वतःची चव लोकांना आवडली पाहिजे ,म्हणूनच निराश न होता सतत जे काम हाती घेतले ते अभ्यास करून पूर्ण करा..एक नंतर दोन .दोन नंतर तीन..असे करत करत..अनेक कामे वेळेत करा..मग तुमचे व्यक्तिमत्व लोकांना माहीत होते..कामाचा माणूस म्हणून घरी ,शेजारी,कौतुक होते, जिथे काम करता तिथेही लोक आपल्याला चांगले म्हणू. लागतात आपला सल्ला घेऊ लागतात ..म्हणूनच असे शिक्षण घ्यावे, की लोकांनी जगाने तुमचेच नाव घेतले पाहिजे,,पुस्तके अशी वाचून आत्मसात करा की त्या पुस्तकातील प्रत्येक विभागात काय
आहे हे तुम्हाला सांगता यायलाच पाहिजे..आपल्या शिक्षणाने लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत उद्देश सफल झाले पाहिजेत..मला वाटते ..यातून आपण स्वतः अंतर्मुख व्हाल..आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण कराल , आळस करणार नाहीत,वेळ वाया घालवणार नाहीत, अखंड प्रयत्न थांबवणार नाहीत अशी मला आशा आहे.. आपण काय करत आहात मी पाहतोय.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा

