पवार-मोदी भेटीवर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक' टोला! तीन शब्दांत उत्तर देत संपवला विषय

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीवर राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. "त्यालाच जंतरमंतर म्हणतात", ३ शब्दांत उत्तर देत उडवली खिल्ली.

मुंबई: राजधानी दिल्लीत 'नीट' परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन प्रचंड पेटले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. एकीकडे शरद पवारांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि लगेचच त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या संपूर्ण घडामोडीवर मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी अवघ्या तीन शब्दांत अत्यंत मिश्किल आणि टोमणेवजा उत्तर देत संपूर्ण विषयच संपवून टाकला.

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि २६ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. काँग्रेसच्या काळातही आंदोलने झाली म्हणूनच जनतेने भाजपकडे सत्ता दिली, पण हेही तसेच निघाले, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली. याच दरम्यान पत्रकारांनी त्यांना दिल्लीतील पवार-मोदी यांच्या हायप्रोफाईल भेटीबद्दल विचारणा केली असता, राज ठाकरेंनी "त्यालाच जंतरमंतर म्हणतात" अशी तीन शब्दांत मार्मिक प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला आणि राजकीय गोटात या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचे फोटो स्वतः पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. एका बाजूला रस्त्यावरील संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीतील राजकीय वाटाघाटी, यावर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाष्य करत एका वाक्यात संपूर्ण परिस्थितीचा सार मांडला. ठाकरे बंधूंच्या या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे आणि राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आगामी काळातील आंदोलनाला आणि राजकीय समीकरणांना वेगळेच वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

Latest News

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा "धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा
नीट पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर आंदोलन अधिक तीव्र! सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा. २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक.
NEET Paper Leak: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर 'इंडिया' आघाडी ठाम; राहुल गांधींसह खासदार रस्त्यावर!
CJP चे आंदोलन पेटले! जंतर-मंतरवर हजारो तरुणांचा एल्गार; पोलिसांकडून कडक बंदोबस्त
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन! अतिवृष्टीबाधित एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन
गुजरातमध्ये अडकले जालना आणि संभाजीनगरचे पर्यटक; एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने प्राण वाचवले

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software