"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

नीट पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर आंदोलन अधिक तीव्र! सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा. २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक.

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक आक्रमक वळण मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच तीव्र इशारा दिला आहे. शिक्षणमंत्र्यांची गच्छंती न झाल्यास हे आंदोलन केवळ एका मंत्र्यापुरते मर्यादित न राहता थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणारे ठरेल, असा सज्जड दम दिपके यांनी दिला असून त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये प्रशासनाला सुनावताना अभिजीत दिपके म्हणाले की, देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा आणि त्यांच्या हक्कांपेक्षा एक अपयशी मंत्री नक्कीच मोठा असू शकत नाही. जर केंद्र सरकार देशातील संतप्त तरुण आणि विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करून एका अपयशी मंत्र्याला पाठीशी घालणार असेल, तर आगामी निवडणुकांमध्ये या देशातील कोणताही तरुण सरकारला मत देणार नाही. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाईसोबतच मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, या मागणीवर त्यांनी पुन्हा एकदा भर दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनाची व्याप्ती वाढवत सीजेपीने २४ जुलै रोजी राज्यभरात आणि देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात 'एक दिवस, एक मागणी' (Every District. One Day. One Demand) या सूत्राखाली देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या शांततापूर्ण निदर्शनांमध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन करणारे माहितीपत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता दिल्लीतील जंतर-मंतरकडे लागले असून २४ जुलै रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनामुळे प्रशासनाची धांदल उडण्याची शक्यता आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

Latest News

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा "धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा
नीट पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर आंदोलन अधिक तीव्र! सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा. २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक.
NEET Paper Leak: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर 'इंडिया' आघाडी ठाम; राहुल गांधींसह खासदार रस्त्यावर!
CJP चे आंदोलन पेटले! जंतर-मंतरवर हजारो तरुणांचा एल्गार; पोलिसांकडून कडक बंदोबस्त
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन! अतिवृष्टीबाधित एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन
गुजरातमध्ये अडकले जालना आणि संभाजीनगरचे पर्यटक; एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने प्राण वाचवले

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software