मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी! मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेचा पुढाकार! मूर्तिकारांना ४०९ टन शाडू माती मोफत वितरित; नैसर्गिक रंगांसाठी १.६३ कोटी मंजूर.

मुंबई: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक मोहिमेला अधिक गती दिली आहे. मुंबईत निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत पालिकेच्या विविध परिमंडळांमधून एकूण ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत ही मागणी एक हजार टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय मूर्ती रंगवण्यासाठी २५ हजार ४०० लिटर नैसर्गिक रंगांच्या वितरणाची तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी १.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्वाधिक शाडू मातीची मागणी 'के ईस्ट', 'डी' आणि 'एफ साऊथ' या विभागांमधून नोंदवण्यात आली आहे. यामध्ये के ईस्ट विभागात सर्वाधिक ६८ टन, डी विभागात ५८ टन तर एफ साऊथ विभागात ४७ टन मातीचे वितरण झाले आहे. तर दुसरीकडे बी आणि के नॉर्थ या विभागांतून सध्या मागणी कमी असली तरी गणेशोत्सव जवळ येईल तसा यामध्ये मोठा वाढीव प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्ण बंदी कायम असून, केवळ ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींनाच नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे.

नैसर्गिक जलस्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासन शहर आणि उपनगरांमध्ये कृत्रिम तलावांची संख्या सातत्याने वाढवत आहे. गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या २९८ कृत्रिम तलावांमध्ये तब्बल १ लाख ८४ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदाही या कृत्रिम तलावांचा अधिक विस्तार केला जाणार आहे. ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू मातीची आवश्यकता असेल, त्यांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

Latest News

"धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा "धर्मेंद्र प्रधानांना हटवा, अन्यथा तुमचाच राजीनामा मागू!" अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा
नीट पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर आंदोलन अधिक तीव्र! सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा. २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक.
NEET Paper Leak: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर 'इंडिया' आघाडी ठाम; राहुल गांधींसह खासदार रस्त्यावर!
CJP चे आंदोलन पेटले! जंतर-मंतरवर हजारो तरुणांचा एल्गार; पोलिसांकडून कडक बंदोबस्त
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन! अतिवृष्टीबाधित एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन
गुजरातमध्ये अडकले जालना आणि संभाजीनगरचे पर्यटक; एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने प्राण वाचवले

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software