देशभर पावसाचा कहर! महाराष्ट्रासह १९ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रासह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा. दिल्ली, यूपीसह विविध राज्यांतील हवामान अंदाज; पाहा सविस्तर अपडेट.

नवी दिल्ली: देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले असून, हवामान विभागाने (IMD) देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी ओडिसा आणि झारखंडसारख्या राज्यांत पावसाने प्रचंड कहर केला असून, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आता या नव्या हवामान बदलामुळे अनेक राज्यांत प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या १९ राज्यांत पावसाचा इशारा?

      हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत मान्सून अत्यंत सक्रिय आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या १९ राज्यांचा समावेश आहे. विशेषतः डोंगराळ राज्यांमध्ये तीव्र भूस्खलनाचा (Landslide) धोका वाढला असून, पूर्वेकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटा सह वीज कोसळण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे.

    राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही मान्सूनच्या सक्रियतेमुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. दिल्लीत आज पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. मुसळधार पावसामुळे राजधानीतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, यामुळे वाहनचालक व नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

      उत्तर प्रदेशमध्येही पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मेरठ, गौतम बुद्ध नगर (नोएडा), अलीगढ, आग्रा, मथुरा, कानपूर, बहराइच, बलरामपूर, आंबेडकर नगर, वाराणसी, चंदौली, सोनभद्र, मिर्झापूर, शाहजहानपूर, रामपूर, उन्नाव, प्रयागराज, देवरिया आणि गोरखपूर या भागांत मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Latest News

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
कोलकाता-चेन्नई इंडिगो विमानाच्या (6E-723) इंजिनमध्ये बिघाड. पायलटने दाखवले प्रसंगावधान; २२४ प्रवाशांसह चेन्नई विमानतळावर सुरक्षित लँडिंग.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख केंद्र बनवणार; फडणवीसांची घोषणा
सर्वोच्च न्यायालया बाहेर ठाकरे-शिंदे गट आमने सामने; अनिल देसाई आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
सुपने मंडळाच्या विकासकामांना वेग; कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software