ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित

मुंबईतील मालाड येथे ब्लिंकिटच्या (Blinkit) गोदामावर एफडीएची (FDA) धडक कारवाई. अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनामुळे परवाना निलंबित; तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वा खालील कारवाई.

मुंबई: अवघ्या काही मिनिटांत जलद डिलिव्हरी देण्यासाठी देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या (Blinkit) मुंबईतील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत धडक कारवाई केली आहे. मालाड परिसरातील या गोदामात अन्न सुरक्षेच्या नियमांचे थेट उल्लंघन, प्रचंड अस्वच्छता आणि झुरळांचा मोठा प्रादुर्भाव आढळल्यामुळे एफडीएनं या गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या कठोर कारवायांच्या सत्रामुळे अन्न व किराणा सामाग्री पुरवठा करणाऱ्या व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

          एफडीएच्या वतीने मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी प्रशासनाच्या पथकाने मालाड पश्चिम येथील सर्वोदय भुवनमधील ब्लिंकिटच्या गोदामाची अचानक पाहणी केली. या तपासणी दरम्यान गोदामामध्ये अत्यंत दयनीय आणि अस्वच्छ परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. भाजीपाला आणि फळे साठवण्याच्या मुख्य जागेमध्ये झुरळांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट असल्याचे आढळले. तसेच, शीतगृहामध्ये (Cold Room) मुदत संपलेले (Expired), खराब झालेले आणि छेडछाड केलेले पॅकेज्ड फूड उघड्यावर पडल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षेचे अत्यंत महत्त्वाचे निकष मानल्या जाणाऱ्या FIFO आणि FEFO (फर्स्ट इन फर्स्ट आऊट आणि फर्स्ट एक्स्पायर्ड फर्स्ट आऊट) या शास्त्रीय पद्धतींचेही या गोदामात अजिबात पालन केले जात नव्हते.

        तपासणी दरम्यान या गोदामात कचरा व्यवस्थापनाचा पूर्ण अभाव, देखभालीतील गंभीर त्रुटी, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करणे, आरोग्यविषयक नोंदींचा अभाव आणि आवश्यक वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता यांसारख्या अनेक त्रुटी उघडकीस आल्या. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या गंभीर बाबींची एफडीएने अत्यंत गांभीर्याने दखल घेत या गोदामाचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक आणि शिस्तप्रिय भूमिकेमुळे राज्यभरात नियमभंग करणाऱ्या मोठ्या कंपन्यांवरही आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software