डॉ. रेवती श्रीनिवासन यांच्या शैक्षणिक कार्याचा ठाण्यात गौरव

ठाण्यात डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित 'Creating Classrooms Where Every Child Belongs' पुस्तकाचे प्रकाशन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शैक्षणिक कार्याचा गौरव.

ठाणे: शिक्षणात पूर्ण, सर्व समावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि आत्मसन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे असून, गेल्या तीन दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी केलेल्या ‘Creating Classrooms Where Every Child Belongs’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ठाण्यात पार पडलेल्या या दिमाखदार कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, डॉ. श्रीनिवासन यांनी केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या, तसेच ग्रामीण व सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणल्याचे गौरवोद्गार काढले. अलीकडेच लंडनच्या प्रतिष्ठित ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये झालेला त्यांचा सन्मान हा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

       कार्यक्रमा दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्याचे लाडके नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, ज्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या शाळा प्रवेशाच्या अर्जांसाठी थेट शाळेत जाण्याच्या जुन्या प्रसंगांचे त्यांनी भावूक स्मरण केले. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ साक्षरता पसरवणे नसून, प्रत्येक बालकाच्या उपजत क्षमतेचा शोध घेऊन त्याला समाजात आत्मसन्मानाने व ताठ मानेने जगण्याचे बळ देणे हा असल्याचे स्पष्ट केले. विशेष गरजा असणारी मुले आणि दुर्गम भागातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. श्रीनिवासन यांचे हे नवे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी आगामी काळात एका दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरेल, असा दृढ विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवात मोठे कारस्थान सुरू असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software