धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

   हिंदी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या घरी निधन झाले. ऑक्टोबरच्या अखेरीस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर १२ दिवसांनी या अभिनेत्याचे निधन झाले. ८ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता ते ९० वर्षांचे झाले असते.  परंतु आज त्यांचे दुःखद निधन झाले.

 बॉलिवूडचा 'ही-मॅन'

बॉलिवूड चा 'ही- मॅन 'म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंब आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी शेअर केली.
 सोमवारी सकाळी देओल कुटुंब मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत पोहोचले होते जिथे धर्मेंद्र यांना अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सनी, बॉबी आणि ईशा देओल स्मशानभूमीत पोहोचले होते. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी देखील स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. अमिताभ बच्चन , आमिर खान आणि अभिषेक बच्चन सारखे बॉलिवूड कलाकार देखील स्मशानभूमीत पोहोचले होते. सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या पिढ्यांना परिभाषित करणाऱ्या ३०० हून अधिक चित्रपट त्यांनी केले होते. 

 

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड

Latest News

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर...
माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​
कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software