- Hindi News
- सातारा
- माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पो...
माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल
दहिवडी: माण तालुक्यातील घोडेवाडी (वारुगड) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांचे खालचे दोन दात पडले आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. भारती विलास पवार (वय ३७, रा. घोडेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास भारती पवार यांचे पती विलास नामदेव पवार हे घरासमोर असताना, गावातीलच सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना गाठले. जुन्या वादाचे निमित्त काढून आरोपींनी अंगणातील चुलीसमोर असलेल्या जळणाच्या लाकडी काठ्या आणि कळकाच्या काठ्यांनी विलास पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी विलास पवार यांच्या डोक्यात, पाठीवर, गुडघ्यावर आणि हाता-पायांवर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर तोंडावर जबर प्रहार केल्याने त्यांचे खालचे दोन दात पडून ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करत असताना आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी
१. मुगुटराव उदयसिंग मदने
२. उदयसिंग मल्हारी मदने
३. निलेश ऊर्फ आबा जगन्नाथ जाधव
४. गणेश महादेव जाधव
५. तुषार मधुकर मदने
६. महादेव मोतीराम जाधव
७. पंडित भगवान जाधव (सर्व रा. वारुगड, ता. माण) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्याची तजबीज सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल दगडू विरकर हे करत आहेत.
