दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड

​उपाध्यक्षपदी दै. प्रभातचे प्रवीण राजे, तर सचिवपदी बापूसाहेब मिसाळ

दहिवडी: दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व सदस्यांनी ही निवड केली. उपाध्यक्षपदी प्रवीण राजे तसेच सचिव पदी बापूसाहेब मिसाळ यांची निवड करण्यात आली.दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात संघाचे संस्थापक लालासाहेब दडस सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

​     ​पत्रकार संघाच्या इतर महत्त्वाच्या पदांवरही अनुभवी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सचिवपदी बापूसाहेब मिसाळ ​प्रसिद्धी प्रमुख पदी सचिन शिंगाडे (संपादक, माणदेश प्राईम) तर ​खजिनदारपदी नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे. ​दहिवडी पत्रकार संघ हा तालुक्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या प्रतिनिधींची संघटना आहे. गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात उमेश बुधावले यांनी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व संघटनेच्या बळकटीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून सर्व सदस्यांनी त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवली आहे.​ निवडी दरम्यान झालेल्या बैठकीला तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि विविध दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये रुपेश कदम (दैनिक सकाळ), नवनाथ जगदाळे (दैनिक लोकमत), विशाल माने (दैनिक पुढारी), दौलत नाईक (दैनिक नवराष्ट्र), लिंगराज साखरे (संपादक, माणदेश माझा), अभिजित अवघडे(दै. पुण्यनगरी ) व विजय जगदाळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.​निवड जाहीर होताच नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड

Latest News

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर...
माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​
कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software