वार्षिक ख्रिसमस सोहळ्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार; कॅरोलीना मध्ये लोकांची पळापळ

 अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली. कॉनकॉर्ड येथे वार्षिक ख्रिस्मस सोहळ्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यात चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  अमेरिकेत 2025 मध्ये आतापर्यंत 350 पेक्षा जास्त मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत.
       कॅरोलीना येथील गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत.गोळीबारात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असून एकाची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. कॉनकॉर्ड पोलीस मेजर पॅट्रिक टियरनी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, शूटिंगची घटना संध्याकाळी 7.30 वाजता यूनियन स्ट्रीटवर कॉर्बिन एवेन्यूजवळ झाली. इवेंटपासून काही अंतरावर ही जागा आहे. गोळीबारानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. गोळीबार कोणी केला? हे अजून समजू शकलेलं नाही. सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड

Latest News

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर...
माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​
कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software