पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' जॉबच्या बहाण्याने तब्बल २२ लाखांचा गंडा; खराडीतील नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

पुणे: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची (Cyber Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरबसल्या चांगला पगार देणाऱ्या नोकरीचे (Job Fraud) आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका ४७ वर्षीय नागरिकाला तब्बल २२ लाख ७ हजार ५०५ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल क्रमांक धारक आणि संबंधित लिंक धारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार घडला.

सायबर भामट्यांनी फिर्यादी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला होता. आपण नागपूर येथून बोलत असल्याचे भासवून आरोपींनी फिर्यादीला एका चांगल्या जॉबची ऑफर दिली. सुरुवातीला मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर आणि लिंकच्या माध्यमातून फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने तब्बल २२,०७,५०५/- रुपये उकळले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजीस्टर क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९ (२), ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. सुशिक्षित नागरिकांनी अशा ऑनलाईन जॉबच्या ऑफर्सला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' जॉबच्या बहाण्याने तब्बल २२ लाखांचा गंडा; खराडीतील नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

Latest News

पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' जॉबच्या बहाण्याने तब्बल २२ लाखांचा गंडा; खराडीतील नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' जॉबच्या बहाण्याने तब्बल २२ लाखांचा गंडा; खराडीतील नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक
पुणे: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची (Cyber Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे....
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर काळाचा घाला; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ५०० फूट दरीत कोसळली, साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यात 'स्पा'च्या नावाखाली सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; वाघोलीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ तरुणींची सुटका
वीज पडून दहिवडी मध्ये इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू..
कराडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीत २ लाखांचा गांजा जप्त; एका महिलेसह दोघे ताब्यात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software