अभिजीत दीपके अजून बच्चा, लक्ष्मण हाकेंचा जरांगेभेटीवरून थेट हल्ला

मनोज जरांगे यांची भेट घेणाऱ्या अभिजीत दीपके यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. 'सामाजिक न्यायाबद्दल अजून कच्चा' असल्याचा टोला.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला चौदा दिवस पूर्ण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे, आणि याच पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतील व्यक्ती त्यांची भेट घेत आहेत. सीजेपीचे (CJP) अभिजीत दीपके यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची घेतलेली भेट ओबीसी नेते आणि क्रांतीकारक ओबीसी महासंघाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या जिव्हारी लागली असून, त्यांनी दीपके यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अभिजीत दीपके अजून बच्चा आहे, आणि सामाजिक न्यायाबद्दल कच्चा आहे,” अशा शब्दांत सुनावत हाके यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे.

       मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अशा स्थितीत अभिजीत दीपके यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला, ज्यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके चांगलेच संतापले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हाके म्हणाले की, दीपके हे अमेरिकून आले असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील मूळ जातवास्तव आणि इथली जात वर्चस्वाची गुंतागुंतीची परिस्थिती पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांनी आधी महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा आणि दलित चळवळीचा सखोल अभ्यास करावा, असा टोला हाकेंनी लगावला. जरांगे यांना पाठिंबा देणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे जातवर्चस्वाला पाठिंबा देण्यासारखे आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

       यावेळी दीपके यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त, आयआयटी इंजिनीअर आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची तुलना मनोज जरांगे यांच्याशी केल्याच्या मुद्यावरही हाकेंनी तीव्र आक्षेप घेतला. एका बाजूला उच्चशिक्षित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सोनम वांगचुक आणि दुसऱ्या बाजूला झुंडशाहीची भाषा करणारे जरांगे, यांची तुलना कशी होऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “अभिजीत दीपके अभी तो बच्चा है, सामाजिक न्याय के बारे में वो कच्चा है,” असे म्हणत हाकेंनी दीपके यांना सामाजिक प्रश्नांची समज नसल्‍याचे म्हटले. आपण शिक्षण आणि भ्रष्टाचारा विरोधी भूमिकेला पाठिंबा देतो, परंतु झुंडशाही आणि आक्रमक भाषा करणाऱ्यांच्या नादी लागू नये, असा सल्ला त्यांनी दिला. जर दीपके यांनी यापुढेही वारंवार जरांगे यांच्या समर्थनाची भूमिका सुरूच ठेवली, तर त्यांनाही सोडणार नाही, असा थेट इशारा देत हाकेंनी संघर्षाचे संकेत दिले आहेत. या वादामुळे आगामी काळात मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील कलगीतुरा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष

Latest News

लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष
गुजरातच्या वनतारा केंद्रातून ४०० दिवसांनंतर माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठात परतली. १,१६० किमी प्रवासानंतर भव्य व भावनिक स्वागत.
कुत्रा समोर आला तरी हात जोडतो, फडणवीसांच्या मिश्कील वक्तव्याने नागपुरात हास्यकल्लोळ
ब्रिक्स परिषदेसाठी दिल्लीला जागतिक नेत्यांची हजेरी; शी जिनपिंग दाखल, पुतिन यांच्या स्वागताची तयारी
१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध? पालकांची संमती, ई-केवायसीची मागणी
अवधेश नारायण सिंहांवरून बिहारमध्ये सत्तासंकटाची चाहूल; नितीश यांच्या निकटवर्तीयाचा दावा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software