लोहगाव ते वाघोलीपर्यंत पोलिसांचा धडाका; २७ सराईत गुन्हेगार तडीपार

गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांची मोठी कारवाई. २७ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार.

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली असून, शहराच्या विविध भागांत दहशत माजविणाऱ्या तब्बल २७ सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने परिमंडळ ७ मधील २२ कुख्यात गुन्हेगारांचा मोठा समावेश असून, भारती विद्यापीठ, वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही सराईत गुन्हेगारांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, महिला व नागरिकांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या लोहगाव, विमानतळ, वाघोली, लोणीकंद आणि चंदन नगर या परिसरांमध्ये सक्रिय असलेल्या एकूण २२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलाम ऊर्फ गुड्डु नवरुलहक मुस्ताफा खान, शुभम सुखदेव सोनवणे, दीपक तुकाराम गायकवाड, अतुल गौतम ढोकरे, आरती संजय साठे ऊर्फ जमदाडे यांसह विमानतळ, वाघोली, लोणीकंद आणि चंदननगर परिसरातील अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्व तडीपार करण्यात आलेल्या आरोपींवर अग्निशस्त्राचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर गुन्ह्यांचा कट रचणे, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, मृत्यू किंवा जबर दुखापतीची धमकी देऊन खंडणी वसूल करणे, जबरी चोऱ्या करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, जुगार अड्डे चालविणे तसेच अवैध गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणे यांसारखे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे.

      याच मोहिमेचा विस्तार करत, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणारे अजिंक्य संतोष काळे, सरफरोज समीर शेख ऊर्फ डर आणि महेश ऊर्फ बंटी विनायक चव्हाण या तिन्ही सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. तसेच, वानवडी व हडपसर परिसरामध्ये शरीरा विरुद्ध आणि मालमत्तेचे गंभीर गुन्हे करणारा मुसा अबू शेख आणि अवैध दारूचा मोठा व्यवसाय चालविणारा अशोक महादेव राऊत या दोघांना पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे कठोर आदेश पारित केले आहेत. मुसा अबू शेख याच्याविरुद्ध मारामारीचे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत, तर अशोक राऊत याच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल होते. पुणे पोलिसांच्या या व्यापक आणि धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाज कंटकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचा कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष

Latest News

लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष
गुजरातच्या वनतारा केंद्रातून ४०० दिवसांनंतर माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठात परतली. १,१६० किमी प्रवासानंतर भव्य व भावनिक स्वागत.
कुत्रा समोर आला तरी हात जोडतो, फडणवीसांच्या मिश्कील वक्तव्याने नागपुरात हास्यकल्लोळ
ब्रिक्स परिषदेसाठी दिल्लीला जागतिक नेत्यांची हजेरी; शी जिनपिंग दाखल, पुतिन यांच्या स्वागताची तयारी
१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध? पालकांची संमती, ई-केवायसीची मागणी
अवधेश नारायण सिंहांवरून बिहारमध्ये सत्तासंकटाची चाहूल; नितीश यांच्या निकटवर्तीयाचा दावा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software