मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा पुढाकार, दुभंगलेले ओठ-टाळू असलेल्या बालकांवर मोफत उपचार

महाराष्ट्रातील दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांसाठी मोफत उपचार योजना. राष्ट्रीय आरोग्य अभियान व स्माईल ट्रेन इंडियात सामंजस्य करार.

मुंबई: राज्यातील प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवा आकार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची योजना प्रत्यक्षात येत आहे. जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू या विकाराने ग्रस्त असलेल्या गरीब व निरागस बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी एक उच्चस्तरीय त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.

      जन्मापासूनच दुभंगलेले ओठ किंवा टाळू असल्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळून जाते, तर आपल्या पोटच्या गोळ्यावर योग्य उपचार करण्यासाठी हतबल झालेल्या पालकांची होणारी परवड अत्यंत वेदनादायी असते. उपचाराचा खर्च अवाढव्य असल्याने तो प्रत्येक सामान्य कुटुंबाला परवडणारा नसतो. राज्याचा पालक या नात्याने या गंभीर समस्येची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकही बालक या विकाराने उपचाराविना वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) तपासणीमध्ये अशा बालकांची ओळख पटवली जाईल. त्यानंतर जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे त्यांना ‘स्माईल ट्रेन इंडिया’च्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

        या सर्व समावेशक उपक्रमांतर्गत बालकांना केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर रुग्णालयातील वास्तव्य, आवश्यक औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा उपचार (स्पीच थेरपी) तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. रुग्णांचे भोजन, निवास आणि प्रवासाचा संपूर्ण खर्च ‘स्माईल ट्रेन इंडिया’ या संस्थेकडून उचलला जाईल. तसेच, शस्त्रक्रिये पूर्वीच्या सर्व तपासण्या आणि उपचारा दरम्यान उद्भवू शकणाऱ्या गुंतागुंतीवरील उपचारांची संपूर्ण जबाबदारीही संबंधित संस्थेचीच राहणार आहे. या योजनेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास पालकांनी १८००१०३८३०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

      या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल १५ नामांकित आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये हे विशेष उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, अहिल्यानगरचे आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, जळगावचे आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगरचे बेंबडे हॉस्पिटल, सोलापूरचे एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, लातूरचे लहाने हॉस्पिटल, मुंबईतील मीरा एनएक्स हॉस्पिटल व शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, ठाण्याचे एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, पुण्याचे पूना हॉस्पिटल, गोंदियाचे सहयोग हॉस्पिटल, अकोल्याचे श्रीराम हॉस्पिटल, नागपूरचे स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नाशिकचे वेदांत हॉस्पिटल प्रा. लि. आणि कोल्हापूरचे वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स) या रुग्णालयांचा समावेश आहे.

       शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना अशा बालकांची योग्य ओळख पटविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयात प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील. या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्यामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियमित त्रयस्थ मूल्यमापन केले जाणार असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त बालकांना लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी

Latest News

लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी
पुणे येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला. मनोज जरांगे समर्थकांवर आरोप करत तात्काळ अटकेची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा पुढाकार, दुभंगलेले ओठ-टाळू असलेल्या बालकांवर मोफत उपचार
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् गर्दी व्यवस्थापनावर सुनेत्रा पवारांचा भर
टोलनाके होणार इतिहासजमा! मार्च २०२७ पर्यंत देशभर बॅरियरमुक्त टोल, गडकरींची मोठी घोषणा
लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software