पुण्याच्या गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् गर्दी व्यवस्थापनावर सुनेत्रा पवारांचा भर

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. वाहतूक, सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनाबाबत दिले कडक निर्देश.

पुणे: पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून आणि राज्यभरातून लाखो नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत असतात. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत नागरिकांना किंवा भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची सर्व यंत्रणा अधिक सक्षमपणे आणि सतर्कतेने कार्यरत ठेवावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा सखोल आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या.

      पुण्यातील प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

       बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे, बस तसेच इतर सार्वजनिक वाहतूक साधनांच्या माध्यमातून प्रचंड संख्येने नागरिक पुण्यात येतात, ज्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. यावर मात करण्यासाठी गर्दीच्या वेळांनुसार आणि गरजे नुसार अतिरिक्त मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच, विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जिथे हजारो नागरिकांची उपस्थिती असते. अशा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व गर्दीचे स्वतंत्रपणे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग आणि वाहन पार्किंगच्या व्यवस्थेची पूर्वकल्पना व योग्य माहिती वेळोवेळी दिली जावी, जेणेकरून वाहतूक कोंडी टळू शकेल.

       उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देताना त्यांनी गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी यांसारख्या अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची २४ तास गस्त आणि अत्यंत प्रभावी बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात शहरात कुठेही वीजपुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी महावितरणने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असे सांगत प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून हा उत्सव सुरळीत पार पाडावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी

Latest News

लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याने खळबळ; जरांगे समर्थकांवर गंभीर आरोप, तात्काळ अटकेची मागणी
पुणे येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला. मनोज जरांगे समर्थकांवर आरोप करत तात्काळ अटकेची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा पुढाकार, दुभंगलेले ओठ-टाळू असलेल्या बालकांवर मोफत उपचार
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् गर्दी व्यवस्थापनावर सुनेत्रा पवारांचा भर
टोलनाके होणार इतिहासजमा! मार्च २०२७ पर्यंत देशभर बॅरियरमुक्त टोल, गडकरींची मोठी घोषणा
लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software