SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश

नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी SIR-२०२६ ची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नागपूर: राज्यात आगामी निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीला वेग आला असून, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ प्रक्रियेतील सर्व टप्प्यांमधील कामे अत्यंत अचूकतेने आणि निर्धारित काल मर्यादेत पूर्ण केली जावीत, असे कडक निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले आहेत. नागपूर येथील नियोजन भवनात पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यांच्या आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

             नागपूर येथील नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीत नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा निहाय कामाची प्रगती, मतदारांशी थेट संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी जाऊन करावयाच्या भेटी, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दावे व हरकती दाखल करणे, नोटीस टप्पा आणि अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

       या पुनरीक्षण प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा असल्याने या कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना श्री. चोकलिंगम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. मतदार याद्या शुद्ध व पारदर्शक ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी परस्पर उत्तम समन्वय साधून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

        या महत्त्वपूर्ण बैठकीला नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भंडारेचे जिल्हाधिकारी सावन कुमार, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, तसेच चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या उत्तरार्धात संबंधित जिल्ह्यां मधील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील मतदार नोंदणी व पुनरीक्षण कामांचे सादरी करण केले असून, ठरवून दिलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश

Latest News

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश
नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी SIR-२०२६ ची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे...
पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर; २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण
कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
शेतीच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार; ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प
पेट्रोल पंपातील भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील इंजिनिअरची सव्वा दोन कोटींची फसवणूक

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software