पेट्रोल पंपातील भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील इंजिनिअरची सव्वा दोन कोटींची फसवणूक

पुण्यात पेट्रोल पंपात भागीदार करण्याचे आमिष दाखवून इंजिनिअरची २ कोटी २९ लाखांची फसवणूक. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भूषण वास्तेवर गुन्हा दाखल.

पुणे: व्यवसायात भरघोस नफ्याचे आणि पेट्रोल पंपात भागीदार करून घेण्याचे खोटे आमीषदाखवून एका ३७ वर्षीय इंजिनिअरची तब्बल २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना पुणे शहरातून समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक फसवणुकीच्या या प्रकारामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, भूषण प्रभाकर वास्ते (वय ३५, मूळ रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कात्रज परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय उच्च शिक्षित इंजिनिअरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून ते आता पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला असून, आरोपीने अत्यंत चलाखीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून हा मोठा आर्थिक अपहार केला आहे.

       मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी भूषण वास्ते याने कराड जवळ मित्रांच्या मदतीने एक 'सह्याद्री पेट्रोल पंप' चालविण्यास घेतला होता. याच पेट्रोल पंपामध्ये फिर्यादी इंजिनिअरला भागीदार (पार्टनर) करून घेतो, असे सांगून त्याने गळ घातली. या व्यवसायात चांगला नफा मिळेल असा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने वेगवेगळ्या कारणांसाठी आणि गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादी कडून वेळोवेळी स्वतःच्या तसेच सह्याद्री पेट्रोल पंपाच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून घेतली. मात्र, पैसे घेतल्यावरही आरोपीने फिर्यादीला व्यवसायाचा कोणताही परतावा अथवा नफा दिला नाही.

       दरम्यान, ज्या मित्रांच्या मदतीने हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला होता, त्या व्यवसायात आरोपीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागला. हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादीने आपली गुंतवणूक आणि परतावा परत मागितला. सुरुवातीला काही किरकोळ रक्कम परत केल्यानंतर, उरलेली मोठी रक्कम देण्यास आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही तब्बल २ कोटी २९ लाख ८ हजार ३०१ रुपये परत न केल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित इंजिनिअरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश

Latest News

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश
नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी SIR-२०२६ ची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे...
पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर; २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण
कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
शेतीच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार; ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प
पेट्रोल पंपातील भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील इंजिनिअरची सव्वा दोन कोटींची फसवणूक

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software