गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून; बारामतीत खळबळ, दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बारामती तालुक्यातील पणदरे येथे गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून. माळेगाव पोलिसांनी २ तासांत आरोपी गणेश मानेला ठोकल्या बेड्या.

बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक अतिशय संतापजनक, मन हेलावून टाकणारी आणि काळीज थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील पणदरे गावात घरात एकट्या असलेल्या एका तीस वर्षीय गर्भवती महिलेवर प्राणघातक हल्ला करत नराधमाने आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून टॉवेलने गळा आवळून तिचा निर्घृण खून केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या अत्यंत गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि धडाडीने सूत्रे हलवत अवघ्या दोन तासांच्या आत नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, या प्रकरणातील मृत महिला वैशाली तानाजी पवार (वय ३०) ही आपल्या पतीसह पणदरे येथील एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होती. तिचा पती तानाजी पवार हा बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी बाहेर गेला आणि रात्री उशिरा घरी परतला. मात्र, रात्री जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी वैशाली ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडली होती. हे विदारक चित्र पाहून हवालदिल झालेल्या पतीने तिथेच हंबरडा फोडला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक तातडीने धावून आले आणि त्यांनी तात्काळ याची माहिती मृत महिलेच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांना तसेच माळेगाव पोलिसांना दिली.

        माळेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या शवविच्छेदना दरम्यान वैशाली पवार ही गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे या गुन्ह्याची भीषणता आणखीनच वाढली. पोलिसांनी अत्यंत बारकाईने घटना स्थळाची पाहणी करून परिसरातील संशयास्पद हालचालींची व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) या संशयिताला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

       आरोपी गणेश माने याने पोलिसां समोर दिलेल्या जबाबी नुसार, त्याच्या वाईट हेतूने त्याने घरात एकट्या असलेल्या वैशालीवर अगोदर हातोड्याने डोक्यात व शरीरावर वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिच्यावर बळजोरीने लैंगिक अत्याचार केला. ही क्रूरता केल्यानंतर वैशाली तीव्र विरोध करत असताना आणि हा प्रकार कोणाला सांगण्याची भीती असताना, तिचे तोंड बंद करण्यासाठी त्याने टॉवेलने तिचा गळा आवळून तिचा प्राण घेतला. एवढ्यावरच न थांबता, खून केल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे त्याने वैशालीच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि पायातील पैजण असा ऐंशी चोरी करून तिथून पळ काढला होता.

         माळेगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तांत्रिक व गोपनीय तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला हातोडा आणि मृत महिलेकडून चोरलेले सोन्याचे दागिने व इतर ऐवज जप्त केला आहे. ही अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अनिल ओमासे, संजय मोहिते यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने पार पाडली आहे. एका गर्भवती महिलेवर झालेल्या या अमानुष अत्याचारा बद्दल आणि खुनाबद्दल सर्वसामान्य नागरिकां मधून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत असून परिसरात शोकाकुल व संतापाचे वातावरण पसरले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर

Latest News

दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर
दिल्लीतील वायू प्रदूषणावर हवामानातील बदलांचा तब्बल ५१ तासांनंतर परिणाम होतो, असा शोध IITM पुण्याच्या संशोधकांनी लावला आहे.
अंतराळात युद्धाची तयारी? अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव; कक्षेत शस्त्र तैनातीने खळबळ
गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून; बारामतीत खळबळ, दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शेतकरी, सामान्य जनता अन् सहकाराला मोठा दिलासा; फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
जमिनीच्या मोजणीचे आमिष, ९१ हजारांचा गंडा; पैसे मागताच सेवानिवृत्त पोलिसाला जीवे मारण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software