पुण्यात ५० हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जाळ्यात

पुण्यात ACB ची मोठी कारवाई! लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे API कृष्णा बाबर ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले.

पुणे: गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात लवकरात लवकर दाखल करण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्याच्या बदल्यात तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाला (API) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर २०२६) रात्री मांजरी येथील शितलादेवी मंदिरा समोर सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे पुणे पोलीस दल व महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. मांजरी, पुणे) असे लाच घेताना जाळ्यात अडकलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

         या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, ५७ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमां नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात विनाविलंब लवकरात लवकर दाखल करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या मुलाच्या न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात कायदेशीर मदत व अनुकूल अहवाल देण्यासाठी आरोपी ए.पी.आय. बाबर यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याशिवाय इतर मदतीपोटी मोठ्या रकमेची मागणी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

       पोलिसांच्या विरोधात थेट कारवाईची हिंमत करत तक्रारदाराने याप्रकरणी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली. या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गत ८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान आरोपी कृष्णा बाबर यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचण्याचे नियोजन केले.

        मंगळवारी रात्री मांजरी परिसरातील शितलादेवी मंदिरासमोर, श्रीकांत ट्रेडिंग दुकानाजवळ एसीबीच्या पथकाने सापळा लावला. यावेळी आरोपी साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांनी स्वतःच्या सियाज कारमध्ये (क्र. एमएच ०४ - केबी - ७८७९) बसून तक्रारदाराकडून ठरल्याप्रमाणे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. रात्री उशिरा २३:०२ वाजता ही कारवाई औपचारिकपणे पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हटकुर या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई पार पाडली आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी

Latest News

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी
चंद्रकांत पाटील व महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या संतोष पंडितची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी.
महिला प्रवाशाच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा कठोर निकाल; आरोपीला १ वर्षाची सक्तमजुरी
काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पुण्यात मानाच्या गणपतींच्या मूर्ती कार्यकर्त्यांकडे
दौंडमध्ये विमा फसवणुकीचा प्रकार उघड, जीवनरेखा हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा
गजानन मारणे टोळीला मोठा धक्का; दीड वर्षांपासून फरार श्रीकांत पवार जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software