अनंत चतुर्दशीला मेट्रोचा खास निर्णय; सलग ४१ तास सेवा सुरू राहणार

पुणे मेट्रोचा गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय! १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान रात्री २ वाजेपर्यंत, तर अनंत चतुर्दशीला सलग ४१ तास धावणार मेट्रो.

पुणे: आगामी लाडक्या बाप्पाच्या आगमना निमित्त आणि दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व सुकर करण्यासाठी महामेट्रोने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासा दायक निर्णय घेतला आहे. उत्सवा दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले असून, यंदाच्या उत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. या विशेष नियोजनामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, मध्यरात्रीपर्यंत मेट्रोचा प्रवास करणे शक्य होणार आहे.

       पुणे मेट्रो प्रशासनाकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, उत्सवाच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत मेट्रोची सेवा नेहमीच्या नियमा नुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच सुरू राहील. मात्र, १७ ते २४ सप्टेंबर या मुख्य गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. या आठ दिवसांत मेट्रो सेवा सकाळी ६ वाजेपासून थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवासांठी उपलब्ध असणार आहे. यात १८ सप्टेंबर रोजी असणाऱ्या गौरी पूजनाच्या पवित्र दिवसाचाही समावेश असून, रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुका पाहणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत वरदान ठरणार आहे. याशिवाय, अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणारी मेट्रो सेवा सलग २४ तास पार करत २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल सलग ४१ तास विनाखंड सुरू राहणार आहे. यानंतर आगामी २७ सप्टेंबर पासून मेट्रोची सेवा पुन्हा नेहमीच्या नियमित वेळापत्रका नुसार पूर्ववत केली जाईल.

         प्रवाशांची वाढती गर्दी आणि स्थानकांवर होणारी तुडुंब गर्दी नियंत्रित करण्यासाठी महामेट्रोने यंदा फेऱ्यांच्या वारंवारते मध्येही मोठी वाढ केली आहे. मेट्रोला नागरिकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, गर्दीच्या वेळेत आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. या नवीन नियोजनाची गेल्या तीन दिवसां पासून तांत्रिक चाचणी सुरू असून, ती यशस्वी ठरल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. दरम्यान, गणेशोत्सवाच्या या आनंदाच्या वातावरणात प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मेट्रो स्थानकांवर आणि चालत्या गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार किंवा चोरट्यांकडून मोबाईल, पाकिटे, सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या सामानाची व मौल्यवान वस्तूंची स्वतः विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदती साठी किंवा माहितीसाठी मेट्रोच्या १८००२७०५५०१ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार असून, या सुनियोजित व्यवस्थेमुळे यंदाचा गणेशोत्सव पुणेकरांसाठी अधिक आनंददायी ठरणार आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी

Latest News

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी
चंद्रकांत पाटील व महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या संतोष पंडितची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी.
महिला प्रवाशाच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा कठोर निकाल; आरोपीला १ वर्षाची सक्तमजुरी
काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पुण्यात मानाच्या गणपतींच्या मूर्ती कार्यकर्त्यांकडे
दौंडमध्ये विमा फसवणुकीचा प्रकार उघड, जीवनरेखा हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा
गजानन मारणे टोळीला मोठा धक्का; दीड वर्षांपासून फरार श्रीकांत पवार जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software