दहिवडीत रहस्यमय मृत्यू; सिमेंट पाईपमध्ये आढळला ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह

साताऱ्यातील दहिवडी-गोंदवले रस्त्यावर सिमेंट पाईपमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. दहिवडी पोलिसांनी नोंदवला अकस्मात मृत्यूचा गुन्हा.

दहिवडी: सातारा जिल्ह्यातील दहिवडी ते गोंदवले रस्त्यावर असलेल्या नाथाच्या तालीजवळील पुलाखाली एका सिमेंटच्या पाईपमध्ये अंदाजे ५० ते ६० वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ६ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, मृत व्यक्तीची नेमकी ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

       मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नगरपंचायत दहिवडी येथील मुकादम जयसिंग शंकर अवघडे (वय ५५) यांनी या घटनेची खबर तातडीने पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

       मृत व्यक्ती पुरुष जातीची असून त्याचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे इतके आहे. मृतदेहाची कोणतीही ओळख पटू शकलेली नाही आणि मृत व्यक्तीचे नाव व पत्ता अद्याप अस्पष्ट आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासना कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सदर प्रकरणाची नोंद सहायक पोलीस फौजदार पी. जी. हांगे यांनी केली असून, पोलीस हवालदार खांडेकर या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत. या मृतदेहा बाबत किंवा त्याच्या वारसांबाबत कोणालाही काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ दहिवडी पोलीस ठाणेशी अथवा तपासी अंमलदार पोलीस हवालदार खांडेकर (८४०८०१७८३८) आणि दाखल अंमलदार ए.एस.आय. हांगे (९८५००४९७००) यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी

Latest News

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी
चंद्रकांत पाटील व महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या संतोष पंडितची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी.
महिला प्रवाशाच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा कठोर निकाल; आरोपीला १ वर्षाची सक्तमजुरी
काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पुण्यात मानाच्या गणपतींच्या मूर्ती कार्यकर्त्यांकडे
दौंडमध्ये विमा फसवणुकीचा प्रकार उघड, जीवनरेखा हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा
गजानन मारणे टोळीला मोठा धक्का; दीड वर्षांपासून फरार श्रीकांत पवार जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software