गजानन मारणे टोळीला मोठा धक्का; दीड वर्षांपासून फरार श्रीकांत पवार जेरबंद

पुण्यात गजानन मारणे टोळीचा म्होरक्या श्रीकांत पवार उर्फ बाब्या याला मोक्का गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट ३ ने वाडे बोल्हाई येथून केली अटक.

पुणे: पुणे शहर आणि लगतच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गजानन मारणे टोळीच्या एका प्रमुख म्होरक्याला पुणे लोहमार्ग व गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्याखाली तब्बल दीड वर्षांपासून फरार असलेल्या ३९ वर्षीय सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत जेरबंद केले आहे. श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार (वय ३९, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव असून, या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

        कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ष २०२५ मध्ये भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यामध्ये श्रीकांत पवार हा मुख्य पाहिजे असलेला सराईत आरोपी होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत भूमिगत झाला होता. गेल्या दीड वर्षांपासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. यादरम्यान, गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अंमलदार अतुल साठे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे (Technical Analysis) जाळे पसरवले असता, आरोपी पवार हा हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई येथील अपनाघर सोसायटी मध्ये आपल्या एका मित्रासोबत आश्रय घेऊन राहत असल्याची खात्रीशीर माहिती निष्पन्न झाली.

      ही गोपनिय माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ वाडे बोल्हाई येथील संबंधित इमारतीवर छापा टाकण्याचे नियोजन केले. पोलिसांच्या पथकाने अत्यंत वेगाने हालचाली करत संबंधित घराला सर्व बाजूंनी भक्कम वेढा घातला. आरोपीला पळून जाण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी न देता पोलिसांनी त्याला घरातूनच मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया व पंचनाम्याची औपचारिकता पूर्ण करून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त शैलेश सांखे यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

       ही धडाकेबाज कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश सांखे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र नलवडे, अतुल साठे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, तुषार किंद्रे, विपुन गायकवाड आणि आशिष राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या सतर्कतेची प्रचिती आली असून, फरार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी

Latest News

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह रील; संतोष पंडितची येरवडा कारागृहात रवानगी
चंद्रकांत पाटील व महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या संतोष पंडितची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी.
महिला प्रवाशाच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा कठोर निकाल; आरोपीला १ वर्षाची सक्तमजुरी
काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पुण्यात मानाच्या गणपतींच्या मूर्ती कार्यकर्त्यांकडे
दौंडमध्ये विमा फसवणुकीचा प्रकार उघड, जीवनरेखा हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा
गजानन मारणे टोळीला मोठा धक्का; दीड वर्षांपासून फरार श्रीकांत पवार जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software