पुण्यातील नामांकित हॉटेलांवर पोलिसांची कठोर कारवाई

परदेशी नागरिकांची माहिती वेळेत न दिल्याने पुण्यातील जे.डब्ल्यु. मेरियट व शेरटन ग्रँड हॉटेल्सवर गुन्हे दाखल. पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांची कारवाई.

पुणे: पंचतारांकित हॉटेल्स मध्ये वास्तव्याला येणाऱ्या परदेशी नागरिकांची आणि पर्यटकांची माहिती विहित मुदतीत व नियमा नुसार पोलिसांना न दिल्या प्रकरणी पुण्यातील नामांकित ‘जे.डब्ल्यु. मेरियट’ आणि ‘शेरटन ग्रँड’ या दोन मोठ्या हॉटेल्सवर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. परदेशी नागरिक तसेच भाडेकरूंच्या माहितीची खातरजमा करून ती वेळेत पोलिसांना देण्या बाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी संपूर्ण पुणे शहरात विशेष मोहीम उघडली असून, या मोहिमे दरम्यान या दोन्ही हॉटेल्सचा गंभीरशीर हलगर्जीपणा उजेडात आला आहे.

      सेनापती बापट रोड येथील विख्यात ‘जे.डब्ल्यु. मेरियट’ हॉटेलमध्ये इटली देशाचे परकीय नागरिक क्रिस्टीन हुबेर (Christian Huber) हे ७ जून २०२६ रोजी वास्तव्यासाठी आले होते. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने अत्यंत संवेदनशील मानली जाणारी ही माहिती तब्बल ३९ दिवस ११ तास (एकूण ९४७ तास) उशिरा, म्हणजेच १७ जुलै २०२६ रोजी पोलिसांकडे नोंदवली. अत्यंत महत्त्वाची सुरक्षा विषयक माहिती हेतुपूर्वक आणि मोठ्या दिरंगाईने भरत व्यवस्थापनाने नियमांचे उघड उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

       दुसऱ्या एका प्रकरणात, ‘शेरटन ग्रँड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चीनचे नागरिक क्यु लुओ (Qi Luo) हे १४ जून २०२६ रोजी सायंकाळी वास्तव्यासाठी दाखल झाले होते. या परदेशी नागरिकाच्या आगमनाची माहिती देखील हॉटेलने १४ दिवस १ तास (एकूण ३३७ तास) उशिरा, २८ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता भरल्याचे समोर आले. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व माहिती प्रशासनाला वेळेत न पुरवता नियमांना डावलल्या प्रकरणी या दोन्ही हॉटेल व्यवस्थापनां विरोधात चतुःश्रृंगी आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील कसून तपास सुरू असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा व्यावसायिक आस्थापनांवर आगामी काळातही कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांना मोठा दिलासा; २० लाखांचे वैद्यकीय संरक्षण

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software