ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

पुणे पोलिसांचा दहीहंडी व गणेशोत्सवासाठी कडक इशारा. ध्वनिमर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल अन् साऊंड सिस्टीम जप्त होणार; ४ बेस ४ टॉपची अट.

पुणे: आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत्या ध्वनि प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे आणि ठरवून दिलेली ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव तसेच दहीहंडी मंडळांवर थेट गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांची संपूर्ण ‘साउंड सिस्टिम’ जप्त केली जाईल, असा कडक इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

        शहरात शनिवारी (ता. ५) दहीहंडी उत्सव साजरा होत असताना, उत्सवा दरम्यान ‘डीजे’ आणि ‘बेस’च्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा तीव्र त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष दक्षता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

       याशिवाय, नियमावली नुसार केवळ 'चार बेस आणि चार टॉप' वापरण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, पोलीस प्रशासन आणि विविध मंडळांच्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा एकही बेस किंवा टॉप जास्त वापरल्याचे आढळल्यास संबंधित मंडळावर तात्काळ गुन्हा नोंदवून संपूर्ण साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

          आवाजाची अचूक तीव्रता तपासण्यासाठी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये विशेष ‘डेसिबल मीटर’ पथके तैनात करण्यात येणार आहेत. परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज आढळल्यास संबंधित मंडळ, डीजे चालक आणि साऊंड सिस्टिम मालका विरोधात थेट पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्सवा दरम्यान कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software