सिंहगड सिटी स्कूलच्या संस्थापकांविरोधात गुन्हा; पालिका आदेशाचे उल्लंघन

पुणे पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करून शाळा स्थलांतरित करणे व बेकायदेशीर प्रवेश घेतल्याप्रकरणी मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल.

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत आदेशाला थेट न जुमानता शासकीय परवानगीशिवाय शाळेचे स्थलांतर करणे आणि अनधिकृतपणे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांना चांगलेच महागात पडले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारी वरून कोंढवा बुद्रुक पोलिसांनी सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले आणि संस्थेच्या सचिव सुनंदा मारुती नवले यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

      कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयातील शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे यांनी याप्रकरणी कोंढवा बुद्रुक पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी तर्फे कोंढवा बुद्रुक परिसरात चालविण्यात येणारे सिंहगड सिटी स्कूल कोणतीही कायदेशीर किंवा शासकीय परवानगी न घेता अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेला अधिकृत पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे शाळेने मूळ मंजूर ठिकाणा शिवाय इतरत्र कामकाज चालवू नये आणि पालकांना अंधारात ठेवून कोणतेही नवीन प्रवेश देऊ नयेत, असे सक्त निर्देश देण्यात आले होते.

        मात्र, महापालिकेच्या या स्पष्ट आदेशाची पायमल्ली करत संस्थेने प्रशासकीय नियमांना बगल दिली आणि आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये तब्बल ६२ नवीन विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने घातलेल्या बंदीची आणि शाळेच्या अनधिकृत स्थलांतराची कोणतीही माहिती संबंधित पालकांना न देता परस्पर प्रवेश प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शालेय नियमांचे व प्रशासकीय आदेशांचे अशा प्रकारे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेत पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीच्या आधारे कोंढवा बुद्रुक पोलिसांनी संबंधित संचालकांवर गुन्हा नोंदवून घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास तीव्र करण्यात आला आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल

Latest News

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल ‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
आयसीटी माटुंगा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन. वैज्ञानिकांना हरित व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन.
कामगारांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय; ईएसआयसी रुग्णालयांत खासगी रुग्णालयांच्या मदतीने उपचार
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज; मोदी-पुतीन-शी जिनपिंग भेटीने वाढली उत्सुकता
अमेरिकेतील भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; H-1Bचा ६० दिवसांचा अवधी रद्द होण्याची शक्यता
एमपीएससीच्या गट-क परीक्षेचे वेळापत्रक बदलले; आता ३ जानेवारीला परीक्षा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software