ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज; मोदी-पुतीन-शी जिनपिंग भेटीने वाढली उत्सुकता

दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ वी ब्रिक्स शिखर परिषद. व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने जागतिक राजकारणात उत्सुकता.

नवी दिल्ली: भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अठराव्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी संपूर्ण सुरक्षा व व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या शनिवारी (दि. १२) आणि रविवारी (दि. १३) पार पडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या परिषदेतून जागतिक राजकारणाला काय दिशा मिळते, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

       दोन दिवसीय या परिषदेचा मुख्य कार्यक्रम शनिवारी अकरा सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या सहभागाने सुरू होईल, तर रविवारी यात विविध भागीदार देश व निमंत्रित देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. बहुपक्षीयता, जागतिक व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्नसुरक्षा, पुरवठा साखळी आणि जागतिक प्रशासन या कळीच्या मुद्द्यांवर या परिषदेत सखोल मंथन अपेक्षित आहे. ‘ब्रिक्स’ समूहात सध्या ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या अकरा देशांचा समावेश आहे. संघर्षग्रस्त इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची या परिषदेतील उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत; परराष्ट्रमंत्री हुमायून कबीर यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस हेदेखील प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी होणार आहेत.

        सुरुवातीला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याबाबत स्पष्टता न दिल्याने काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, नंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयाने औपचारिक घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जिनपिंग या परिषदेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे शुक्रवारी (दि. ११) तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रविवारी दिल्लीत दाखल होणार आहेत. दोन्ही जागतिक नेते पालम येथील भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर उतरल्यानंतर चाणक्यपुरी परिसरातील निर्धारित हॉटेल्समध्ये मुक्कामासाठी रवाना होतील. सुरक्षेच्या कारणास्तव रशियन व चिनी सुरक्षा यंत्रणांची विशेष पथके आधीच हॉटेल परिसरात तैनात करण्यात आली आहेत. या परिषदेत बेलारूस, कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, क्युबा, नायजेरिया, उझबेकिस्तान आणि युगांडा हे भागीदार व निमंत्रित देशही सहभागी होत आहेत.

         या उच्चस्तरीय परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारणे, सीमावादावर तोडगा काढण्याच्या दिशेने पावले उचलणे आणि आर्थिक व व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल

Latest News

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल ‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
आयसीटी माटुंगा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन. वैज्ञानिकांना हरित व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन.
कामगारांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय; ईएसआयसी रुग्णालयांत खासगी रुग्णालयांच्या मदतीने उपचार
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज; मोदी-पुतीन-शी जिनपिंग भेटीने वाढली उत्सुकता
अमेरिकेतील भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; H-1Bचा ६० दिवसांचा अवधी रद्द होण्याची शक्यता
एमपीएससीच्या गट-क परीक्षेचे वेळापत्रक बदलले; आता ३ जानेवारीला परीक्षा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software