पुण्यातील खडकवासला परिसरात भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक फरार

पुण्यातील खडकवासला येथे भरधाव टेम्पोच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू. नांदेड सिटी पोलिसांत अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल.

पुणे: पुण्यातील खडकवासला परिसरामध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अपघातानंतर संतापजनक बाब म्हणजे टेम्पोचालक जखमीला मदत न करता घटनास्थळी न थांबताच वाहनासह पसार झाला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

       मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, कलफ शाबीर हुसेन (वय २६, सध्या रा. न्यू कोपरे गाव, एनडीए रस्ता) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. हुसेन हे ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून खडकवासला परिसराबाट जात असताना, डीआयटी (DIT) संस्थेच्या प्रवेशद्वारा समोर मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हुसेन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर मानवी संवेदनांना विसरत टेम्पोचालकाने घटनास्थळी न थांबता आपले वाहन वेगाने पळवून नेले. गंभीर जखमी झालेल्या कलफ शाबीर हुसेन यांना रुग्णालयात हलवण्यापूर्वी किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

      या अपघाता प्रकरणी मृत तरुण हुसेन यांचे पुतण्या मोहम्मद गोली साह (वय १९, सध्या रा. तळेगाव दाभाडे; मूळ रा. रन्नुडी लालपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पसार झालेल्या टेम्पोचालका विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरारी टेम्पोचालकाचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल

Latest News

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल ‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
आयसीटी माटुंगा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन. वैज्ञानिकांना हरित व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन.
कामगारांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय; ईएसआयसी रुग्णालयांत खासगी रुग्णालयांच्या मदतीने उपचार
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज; मोदी-पुतीन-शी जिनपिंग भेटीने वाढली उत्सुकता
अमेरिकेतील भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; H-1Bचा ६० दिवसांचा अवधी रद्द होण्याची शक्यता
एमपीएससीच्या गट-क परीक्षेचे वेळापत्रक बदलले; आता ३ जानेवारीला परीक्षा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software