अमरावती विभागातील दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा; ‘ट्रिगर-१’नुसार मदतीचा आदेश, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत

अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 'ट्रिगर-१' नुसार दिवाळीपूर्वी मदत जाहीर. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार तातडीने निधी देणार.

अमरावती: राज्यात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण व आक्रमक पावले उचलली आहेत. अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्र झळ पिकांना बसली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणारी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत दुष्काळ संहितेच्या ‘ट्रिगर-१’ (Trigger-1) निकषांनुसार मदतीचा शासन आदेश उद्याच काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

          वाशिमसह अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर विभागीय आयुक्त नयना गुंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी उच्चस्तरीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या मदतीची कोणतीही वाट पाहणार नाही, तर स्वबळावर तातडीने मदत वितरीत केली जाईल. तसेच, केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसाठी आवश्यक असणारे पंचनामे आणि इतर तांत्रिक प्रस्ताव तातडीने पूर्ण करून पाठविण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत. सर्वदूर पिकांची बिकट परिस्थिती पाहता शासनाने व्यापक मदत धोरण आखले असून, ही सर्व मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे नियोजन केले जात आहे.

          दुष्काळाच्या या संकटात केवळ पीक नुकसानीची भरपाईच नव्हे, तर आगामी काळातील पाणीटंचाई आणि चाराटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. गरज भासल्यास अन्नधान्याची मदतही पुरवली जाईल. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या उच्च व शालेय शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी थेट आर्थिक मदत केली जाईल. तसेच, रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा ताळेबंद तपासून पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष मदत पुरवली जाईल. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाणार असून, आटलेले जलसाठे, तलावा मधील गाळ काढणे, ‘जलतारा’ स्ट्रक्चर उभारणे आणि तातडीने दुरुस्ती आवश्यक असलेल्या तलावांची पुनरुज्जीवन कामे हाती घेतली जातील.

            यावेळी बोलताना त्यांनी इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीची रक्कम सध्या टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असून, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांना नियमा प्रमाणे बँकांनी नवीन पीककर्ज देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी लवकरच शासकीय दराने शेतमाल खरेदी सुरू केली जाणार असून यासाठीची नोंदणी प्रक्रियाही त्वरीत सुरू होईल. दरम्यान, अमरावती येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेल्या आग दुर्घटनेबाबत बोलताना, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software