कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ; मुस्लिम बांधवांच्या अत्तर स्वागताने सामाजिक सलोख्याचा संदेश

पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ झाला. मुस्लिम बांधवांनी अत्तर लावून भक्तांचे स्वागत करत सामाजिक सलोखा जपला.

पुणे: वैभवशाली संस्कृती, परंपरा आणि अथांग उत्साहाचा वारसा असलेल्या पुण्याच्या लाडक्या गणेशोत्सवाची सांगता यंदा अत्यंत दिमाखात आणि चैतन्यमय वातावरणात होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या कानठाळ्या बसणाऱ्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली असून, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर रस्त्यांवर उतरले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात आज सकाळी ठीक दहा वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक विधिवत आरती संपन्न झाली, आणि याच मंगलमय वातावरणात यंदाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा अधिकृत व दिमाखदार शुभारंभ झाला.

        मिरवणुकीच्या या शानदार आरंभा सोबतच मानाचा पहिला श्री कसबा गणपती बाप्पाची आरती करून विसर्जन मिरवणुकीची शान वाढविण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि आकर्षक पालखीतून मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक मंडईतील टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. चौकाचौकात सजलेले ढोल-ताशांचे पथक, नगारा वादन, शंखनाद आणि तरुणांच्या उत्साही लेझीम पथकांनी संपूर्ण वातावरणात वेगळाच जोश भरला होता. उपस्थित पुणेकरांनी प्रत्येक पथकाच्या वादनाला भरभरून दाद दिली, ज्यामुळे संपूर्ण मिरवणूक मार्गावर आनंदाचे आणि भक्तीचे अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले होते.

       यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे एक अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील सांस्कृतिक व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा प्रसंग ठरला. मिरवणूक मार्गावरून पुढे जाणवणाऱ्या विविध गणेश मंडळांचे आणि गणेश भक्तांचे मुस्लिम बांधवा कडून अत्यंत उत्साहात आणि आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व बाप्पाच्या भक्तांना अत्तर लावून या बांधवांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि एकोपा अन् बंधुभावाचा अत्यंत प्रेरक व सवांगसुंदर असा सामाजिक संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिला. पुणे शहराची हीच सर्वसमावेशक आणि गंगा-जमुनी तहजीबची परंपरा यंदाच्या विसर्जन सोहळ्यातही कायम राहिली, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा जोश अशा एकाच छताखाली आलेल्या या अद्भूत सोहळ्यात पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला अत्यंत जड अंतःकरणाने मात्र नव्या उत्साहात निरोप देत आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software