शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

पुणे:

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत.  

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल. निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच आचारसंहिता लागू झाली असून, संपूर्ण मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही नियमावली अमलात राहील.  

शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच संभाव्य उपद्रव टाळता यावा, यासाठी पुणे शहराच्या हद्दीत २३ सप्टेंबर २०२६ पासून ते २७ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत अधिकृत परवाना असलेली किंवा कोणत्याही प्रकारची शस्त्रे व हत्यारे बाळगून फिरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.  

यांना आदेशातून सूट:

कायदेशीर कर्तव्य बजावणारे पोलीस, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा कर्मचारी व इतर शासकीय अधिकारी/कर्मचारी.  

परंपरेनुसार/रुढीनुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती.  

उल्लंघन केल्यास होणार कारवाई

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे शहराचे विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला आहे. सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना या आदेशाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही देण्यात आलेआहेत.  

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software