ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;

प्रशासकीय दबावाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप

दहिवडी प्रतिनिधी,ता.२५:

प्रशासकीय कामांचा वाढता ताण, रात्री उशिरापर्यंत जुने रेकॉर्ड शोधण्याचे आदेश आणि भल्या पहाटे बोलावलेल्या बैठका यांमुळे महसूल प्रशासनातील तलाठ्यांची प्रचंड पिळवणूक होत असून, हा ताण थेट त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी ई-पीक पाहणीच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीला जाताना गोंदवले खुर्द नजीक झालेल्या भीषण अपघातात तलाठी अजित भोसले गंभीर जखमी झाले आहेत.

महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार जुने रेकॉर्ड शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच, आज सकाळी सात वाजताच म्हसवड येथे ई-पीक पाहणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला घाईघाईत जाताना गोंदवले खुर्दजवळ तलाठी अजित भोसले यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्यांना तातडीने म्हसवड येथील डॉ. दोलतडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

 

ई-पीक पाहणीच्या कामासाठी प्रशासनाने सहाय्यकांची नियुक्ती केली होती. मात्र, वेळेवर वेतन न मिळाल्याने अनेक सहाय्यकांनी काम सोडून दिले आहे. अशा स्थितीत "सहाय्यक न मिळाल्यास संपूर्ण ई-पीक पाहणी तलाठ्यांनाच करावी लागेल," असा सज्जड दम महसूल प्रशासनाकडून दिला जात आहे. त्यामुळे तलाठ्यांवर कामाचा अथांग ताण वाढला आहे.

 

सततच्या 'अभियानां'मुळे कर्मचारी मेटाकुटीला

कोणताही राष्ट्रीय सण, उत्सव असो वा एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस, प्रत्येक प्रसंगी तलाठ्यांना नवीन 'अभियान' राबवण्याचे निर्देश दिले जातात. सततच्या या मोहिमांमुळे तलाठी वर्ग पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. "ई-पीक पाहणीच्या नावाखाली तलाठ्यांचा बळी घेणार का?" असा जळजळीत सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

प्रशासनाने तात्काळ खाजगी कामगारांची मदत उपलब्ध करून द्यावी किंवा नवीन नोकरभरती करून तलाठी कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली

जात आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software