लोहगावात धक्कादायक घटना; पत्नीच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुण्यातील लोहगावात पत्नीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या. लोहगाव पोलिसांत पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल.

पुणे: पुण्याच्या लोहगाव परिसरातुन एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरगुती कलह आणि पत्नी कडून मिळणाऱ्या सततच्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला पूर्णपणे कंटाळून एका ३५ वर्षीय तरुणानी टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश अशोक शेळके असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या पत्नी विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या घटने मुळे लोहगाव मधील साठे वस्ती आणि स्वामी समर्थ मठाजवळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादाचे पर्यायी लोण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

       पोलिसा कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, मृत अविनाश शेळके यांना मागील काही काळापासून त्यांच्या पत्नी कडून सातत्याने घरगुती कारणा वरून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या घरगुती कलहा दरम्यान पत्नीकडून वारंवार किरकोळ कारणा वरून वाद घालणे, शिवीगाळ करणे आणि शारीरिक मारहाण करत प्रचंड मानसिक व शारीरिक छळ चालवला होता. या सततच्या त्रासामुळे अविनाश मानसिक तणावाखाली आले होते. अखेर या असह्य त्रासाला आणि अपमानाला कंटाळून त्यांनी राहत्या घरातील बेडरूम मध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या Sudden आणि धक्का दायक प्रकारामुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

           याप्रकरणी मृत तरुण अविनाश यांच्या ६३ वर्षीय आईने पुढे येत लोहगाव पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली आहे. आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०८, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि मारहाण व छळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आता लोहगाव पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. पत्नी कडून नेमका कोणत्या कारणातून हा सातत्य पूर्ण छळ सुरू होता आणि यामागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याचा पोलीस कसून शोध घेत असून कौटुंबिक वादातून उद्भवणाऱ्या अशा वाढत्या घटना वरून चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software