कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विद्युत तारेचा स्पर्श होताच २१ फुटांची गणेशमूर्ती कोसळली

कोल्हापुरातील गोखले कॉलेज चौकात विसर्जन मिरवणुकीत वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती विजेच्या तारेला स्पर्श होऊन कोसळली.

कोल्हापूर: राज्यभरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच, कोल्हापुरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोल्हापुरातील प्रसिद्ध वाय. पी. पोवार नगर मंडळाची तब्बल २१ फूट उंच भव्य गणेशमूर्ती अचानक रस्त्यावर कोसळल्याची दुर्घटना गोखले कॉलेज चौकात घडली. मिरवणूक मार्गावरील एका विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श झाल्यानंतर तिचा तोल सुटला आणि काही क्षणांतच ही दुर्घटना घडली. या अचानक ओढवलेल्या संकटामुळे विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला मोठा धक्का बसून संपूर्ण कोल्हापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

        शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास गोखले कॉलेज चौक परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. वाय. पी. पोवार नगर येथील या मंडळाची भव्यदिव्य गणेशमूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून विसर्जना साठी मार्गस्थ करण्यात आली होती. एका पायावर उभी असलेली आणि काहीशी झुकलेल्या स्थितीतील ही २१ फुटी मूर्ती जेव्हा गोखले कॉलेज चौकात पोहोचली, तेव्हा मार्गावरील ओव्हरहेड विद्युत तारेचा तिला स्पर्श झाला. स्पर्श झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मूर्तीचा समतोल बिघडला आणि काही क्षणांतच ती थेट रस्त्यावर कोसळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यां मध्ये आणि दर्शनासाठी जमलेल्या गणेश भक्तांमध्ये मोठी तारांबळ उडाली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली, तरी बाप्पाची मूर्ती अशा प्रकारे कोसळल्या मुळे उपस्थित भाविकांचे मन हेलावून गेले.

       घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरातील गर्दी बाजूला करत मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेली भव्य मूर्ती बाजूला करण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा आणि गणेश मंडळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. विसर्जन मिरवणूक ज्या ठरलेल्या मार्गावरून नेण्यात येणार होती, त्या मार्गावरील धोकादायक विद्युत तारा आणि अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने बाजूला करण्या बाबत महावितरणला आधीच पूर्वकल्पना व विनंती अर्ज देण्यात आला होता; परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि कोणतीही पूर्वकाळजी घेतली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर दावा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

       दुसरीकडे, महावितरणने मंडळाचे सर्व आरोप फेटाळून लावत आपला कोणताही दोष नसल्याची भूमिका घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची विशेष पथके संपूर्ण मार्गावर तैनात होती आणि आवश्यक ती तांत्रिक कामे आधीच पूर्ण करण्यात आली होती, असे प्रशासना कडून स्पष्ट करण्यात आले. वाय. पी. पोवार नगरपासून गोखले कॉलेज चौका पर्यंत येताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी मदत केल्याचे सांगत त्यांनी आपली बाजू मांडली. मंडळ आणि महावितरण यांच्यातील या परस्पर विरोधी दाव्यांमुळे या दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील आनंदावर काही काळासाठी विरजण पडले असून, अशा भव्य मिरवणुका मध्ये विद्युत सुरक्षा यंत्रणेचे काटेकोर नियोजन किती गरजेचे आहे, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software