भाऊसाहेब रंगारींच्या वेशातील चिमुकल्याचा अनोखा संदेश; ‘आम्ही आस्तिक, ढोल वाजवणारच

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत भाऊसाहेब रंगारींच्या वेशातील चिमुकल्याचा ढोल-ताशा संस्कृतीच्या समर्थनाचा फलक सोशल मीडियावर चर्चेत.

पुणे: पुण्याच्या विश्वप्रसिद्ध अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती, उत्साह आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळत असतानाच, एका चिमुकल्याने आपल्या साध्या पण प्रभावी संदेशाने संपूर्ण पुणेकरांचे आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक व ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या हुबेहूब वेशभूषेत आलेल्या एका लहान मुलाने हातात घेतलेला फलक आणि दिलेला संदेश सध्या सोशल मीडियावर आणि मिरवणूक मार्गावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. ‘आम्ही आस्तिक, ढोल वाजवणारच! कारण आवाज ढोलचा असेल पण त्यामागची भावना बाप्पासाठी असेल...’ असा संदेश देत या चिमुकल्याने पुण्याच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीबद्दलची आपली ठाम भूमिका अतिशय गोड आणि प्रभावी शब्दांत मांडली आहे.

        पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांना शेकडो वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उत्सवातील वाद्यांचा वाढता आवाज, कर्णकर्कश डीजे (DJ) आणि मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीमच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा यंदा ऐरणीवर आला होता. गणेशोत्सवा पूर्वीच शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींनी मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर निर्बंध घालण्याची किंवा बंदीची जोरदार मागणी केली होती. अतिमोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा या मोहिमा मधून लावून धरण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काही गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी या भूमिकेला विरोध दर्शवला होता, तर काही मंडळांनी जर नियम लागू करायचेच असतील, तर ते केवळ एका घटकावर नव्हे तर सर्वांसाठी समान असावेत आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या वादनाला वेठीस धरू नये, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

         या संपूर्ण वादानंतर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वादन आणि ध्वनि प्रदूषणाच्या कायदेशीर मर्यादा यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. एकीकडे नागरिका कडून कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण आणण्याची सक्ती केली जात असताना, दुसरीकडे तरुण वर्ग आणि गणेश भक्तांकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरावर असलेले अफाट प्रेम दिसून येत आहे. अशातच, श्रीमंत भाऊसाहेब रंगारींच्या वेशातील त्या चिमुकल्याने मांडलेली भूमिका ही केवळ एका बालकाची नसून पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचाच जणू आवाज बनली आहे. उत्सवाचा अथांग जल्लोष आणि आनंद कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आणि प्रशासनाच्या ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे तंतोतंत पालन कसे करायचे, यावर आता मंडळांनी आणि पुणेकरांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. परंपरेचा मान राखत आणि नियमांची चौकट न मोडता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा हा सोहळा यंदाच्या गणेशोत्सवात एका नव्या आणि समंजस संदेशासह इतिहासात नोंदवला जात आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software