मराठवाड्यात ठाकरे पिता-पुत्रांचा दौरा; ‘मिशन मराठवाडा’ला गती

शिवसेना ठाकरे गटाने 'मिशन मराठवाडा' हाती घेतले आहे. आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला तर उद्धव ठाकरे १६-१७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या भागात आपले संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठी ‘मिशन मराठवाडा’ हाती घेतले आहे. याच रणधुमाळीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सलग दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्तासंघर्षा पासून दोन्ही प्रमुख गटांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईला या दौऱ्यांमुळे अधिक धार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

       युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, रेंगाळलेले सिंचन प्रकल्प, वाढती बेरोजगारी आणि इतर स्थानिक प्रश्नांचा सखोल आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे, सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्लाबोल करण्यासाठी ते ‘डेव्हलपमेंट डिलेड, डेव्हलपमेंट डिनाईड’ (विकास लांबणीवर, विकास नाकारला) या शीर्षकाखाली विशेष सादरीकरण करणार आहेत. या माध्यमातून प्रशासकीय अपयशाचा मुद्दा पुढे करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आणि १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असणार असून ते शहरात मुक्काम करणार आहेत. १७ सप्टेंबरच्या ऐतिहासिक ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना’चे औचित्य साधत पक्षात नवचैतन्य निर्माण करणे, कार्यकर्त्यां मध्ये ऊर्जा भरणे आणि पक्ष संघटना बुथ पातळीवर मजबूत करण्यावर त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

       एकिकडे ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे निश्चित झाले असताना, दुसरीकडे परभणीत खासदार संजय (बडू) जाधव यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्ति प्रदर्शन करत शिंदे सेनेची ताकद दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी या मेळाव्याला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला होता. त्यातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यामुळे मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे अधिकच तणावपूर्ण बनली आहेत. मराठा आरक्षण, पाणीटंचाई, शेतीचे प्रश्न, सिंचन आणि उद्योगांचे मुद्दे ऐरणीवर आले असताना, ठाकरे व शिंदे गटातील तीव्र संघर्ष आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन या तिहेरी घडामोडींमुळे आगामी काळात मराठवाडा हा राज्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई

Latest News

पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई
पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा आरोप.
पिंपरीच्या सुपुत्राची एमपीएससीत गरुडझेप; निखिल राजगे महसूल सहाय्यकपदी
माण तालुक्यात गणेशोत्सव-उमाजी नाईक जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन
म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश; सचिन अहिरांची उच्चस्तरीय बैठक
मुंबईतील वसतिगृहे-अनाथालयांची पाहणी; महिला व बालक कल्याण समितीचा आढावा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software