- Hindi News
- सातारा
- पिंपरीच्या सुपुत्राची एमपीएससीत गरुडझेप; निखिल राजगे महसूल सहाय्यकपदी
पिंपरीच्या सुपुत्राची एमपीएससीत गरुडझेप; निखिल राजगे महसूल सहाय्यकपदी
एमपीएससी परीक्षेत पिंपरीच्या (दहिवडी) निखिल राजगे यांचे घवघवीत यश. 'महसूल सहाय्यक अधिकारी' पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार.
दहिवडी: श्री हनुमान यात्रेच्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात दहिवडी परिसरातील पिंपरी गावाला एका अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी मिळाली आहे. गावाचे सुपुत्र कु. निखिल सिंधू बलभिम राजगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ‘महसूल सहाय्यक अधिकारी’ पदी आपली निवड निश्चित केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण पिंपरी गावातून आणि परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, या दुहेरी आनंदामुळे गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
श्री हनुमान यात्रे निमित्त गावामध्ये आयोजित विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर निखिल राजगे यांच्या या उज्ज्वल यशाचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील मानकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी निखिल यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील राजकीय व प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निखिल यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी गावासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या अथक मेहनतीला, जिद्दीला आणि चिकाटीला मिळालेले हे यश असून, त्यांच्या कामगिरीतून गावातील तरुण-तरुणींना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निखिल राजगे यांनी आपले यश आई-वडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन आणि ग्रामस्थांच्या निरंतर पाठबळामुळेच शक्य झाल्याचे आवर्जून सांगितले. मिळालेल्या या संधीचा सोनारा करत देशसेवा आणि समाज कार्यासाठी आपले योगदान देण्यास आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले. निखिल यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दिगंबर राजगे, चंद्रकांत शीलवंत आप्पा राजगे, डॉ. दिलीप राजगे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि जिद्दीच्या जोरावर कोणत्याही उच्च परीक्षेत यश मिळवता येते, हेच निखिल राजगे यांनी आपल्या या दैदीप्यमान यशातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.