पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; ६ हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक कारवाई. अस्वच्छता व नियमभंगामुळे ६ आस्थापनांचे परवाने निलंबित, कोंढव्यातून ५९८ किलो मावा जप्त.

पुणे: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन  करणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर भूमिका घेत धडक कारवाई केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंट्स तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची कसून तपासणी करण्यात आली असून, नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या तब्बल सहा प्रमुख आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना व संशयास्पदरित्या वाहतूक केला जाणारा सुमारे दीड लाख रुपयांचा ५९८ किलो मीठा मावा जप्त करण्यात आला असून, सांगली जिल्ह्यातही अशाच स्वरूपाची धडक कारवाई करण्यात आली आहे.

          अन्न व औषध प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या या विशेष मोहिमे दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. तपासणी केलेल्या काही आस्थापनांमध्ये प्रचंड अस्वच्छता, मानवी आरोग्याला अपायकारक ठरतील असे मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ साठवून ठेवणे, तसेच ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील’ (FSSAI) नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांच्या आरोग्याला थेट गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या बाबींची दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत परवाने निलंबित करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लोणावळ्यातील मोरवे येथीलद लोटस रिसॉर्ट’, बिबवेवाडी येथीलद मसल फूड्स’ (बेकरी), पिंपरी-चिंचवडमधील गणेशनगर येथीलहुमा बेकरी’, आंबेगाव बुद्रुकच्या दत्तनगर रस्त्यावरीलन्यू महाराष्ट्र बेकर्स’, सहकारनगर पर्वती येथीलमारकेश व्हेंचर्स’, तसेच कर्वेनगरमधील वारजे जकात नाक्याजवळीलस्विन्स्टा ईएनटी’ यांचा समावेश आहे.

         या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्न व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही सर्वच आस्थापनांची नैतिक जबाबदारी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई तीव्र केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software