- Hindi News
- देश
- सोने-चांदी स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही १०० रुपयांनी उतरली
सोने-चांदी स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही १०० रुपयांनी उतरली
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्यासह चांदीच्या किमती घसरल्या. मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील दर तपासा.
नवी दिल्ली : सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, सात दिवस स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या किमतीतही आज घट झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या सावध वातावरणाचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आहे.
गेल्या दोन दिवसांत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात २३० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २१० रुपयांची घट झाली आहे. याशिवाय एक किलो चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली असून, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर २,३४,९०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (१० ग्रॅम)
| शहर | २४ कॅरेट | २२ कॅरेट | १८ कॅरेट |
|
|
|
|
| दिल्ली | ₹1,44,140 | ₹1,32,140 | ₹1,08,140 |
|
|
|
|
| मुंबई | ₹1,43,990 | ₹1,31,990 | ₹1,07,990 |
|
|
|
|
| कोलकाता | ₹1,43,990 | ₹1,31,990 | ₹1,07,990 |
|
|
|
|
| चेन्नई | ₹1,43,990 | ₹1,31,990 | ₹1,10,140 |
|
|
|
|
| बंगळुरू | ₹1,43,990 | ₹1,31,990 | ₹1,07,990 |
|
|
|
|
| हैदराबाद | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,150 |
|
|
|
|
| लखनऊ | ₹1,44,140 | ₹1,32,140 | ₹1,08,140 |
|
|
|
|
| पाटणा | ₹1,44,040 | ₹1,32,040 | ₹1,08,040 |
|
|
|
|
| जयपूर | ₹1,44,140 | ₹1,32,140 | ₹1,08,140 |
|
|
|
|
| अहमदाबाद | ₹1,44,040 | ₹1,32,040 | ₹1,08,040 |
|
|
|
|
टीप : स्थानिक कर, जीएसटी आणि घडणावळीनुसार दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
घसरणीमागील कारणे
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाई बाबत सावध भूमिका कायम ठेवल्याने व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकी बाबत सावध भूमिका घेतली असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
या आठवड्यात जाहीर होणारा अमेरिकेचा नॉन-फार्म पेरोल (NFP) अहवाल, रोजगाराची आकडेवारी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि कच्च्या तेलाच्या किमती यावर बाजाराचे लक्ष राहणार आहे. या घडामोडींमुळे आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने ग्राहक आणि गुंतवणूक दारांनी बाजारावर लक्ष ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Top of Form
Bottom of Form
